Hurun India Rich List 2021 : गौतम अदानी यांचे भाऊ विनोद अदानी यांचाही श्रीमंतांच्या यादीत समावेश | पुढारी

Hurun India Rich List 2021 : गौतम अदानी यांचे भाऊ विनोद अदानी यांचाही श्रीमंतांच्या यादीत समावेश

पुढारी ऑनलाईन डेस्क : Hurun India Rich List 2021 : मागिल एका वर्षात गौतम अदानी यांनी प्रत्येक दिवशी १००० कोटी रुपयांची कमाई केली आहे. सध्या गौतम अदानी यांची संपत्ती ५,०५,९०० कोटी रुपयांची आहे. एक वर्षापूर्वी ते १,४०,२०० कोटी रुपये मालमत्तेचे मालक होते. तसच मुकेश अंबानी यांच बघायच झाल्यास मागिल एका वर्षात त्यांनी दररोज १६३ कोटी रुपये मिळवलेत. अशा प्रकारे अंबानी यांच्या तुलनेत अदानी यांनी रोज सहा पटीने पैसे कमावले आहेत. सध्या अंबानी यांची संपत्ती ७,१८,००० कोटी रुपये आहे.

एका वर्षात अदानी यांची संपत्ती चार पटीने वाढली

IIFL वेल्थ हुरुन इंडिया रिच लिस्ट 2021 नूसार, एका वर्षात गौतम अदानी यांची संपत्ती चार पटीने वाढली आहे. याअगोदर मे २०२१ मध्ये ते आशियातील दुसरे सर्वात श्रीमंत उद्योगपती होते. पण त्यांच्या कंपनीमधील परदेशी गुंतवणूकदारांच्या बातमीमुळे जूनमध्ये त्यांच्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली होती. त्यामुळे त्यांच्या संपत्तीत घट झाली होती. एनएसडीएलने तीन विदेशी फंडांची खाती गोठवली असल्याचे काही मीडिया रिपोर्टमध्ये सांगण्यात आले होते मात्र, नंतर अदानी पोर्ट्स आणि स्पेशल इकॉनॉमिक झोन लिमिटेडने ही बातमी नाकारली होती.

गौतम अदानी यांचे भाऊ विनोद अदानी यांचाही यादीत समावेश

पहिल्यांदाच गौतम अदानी आणि त्यांचा दुबईस्थित भाऊ विनोद अदानी दोघांनी मिळून आयआयएफएल वेल्थ हुरुन इंडिया रिच लिस्टमध्ये पहिल्या १० मध्ये स्थान मिळवले आहे. विनोद अदानी हे आशियातील आठवे श्रीमंत उद्योगपती आहेत. अहवालानुसार, विनोद अदानी यांची संपत्ती १,३१,६०० कोटी रुपये आहे. एका वर्षात त्यांची संपत्ती २१ टक्क्यांनी वाढली आहे.

टॉप १० उद्योगपतींची यादी

(Hurun India Rich List 2021) IIFL वेल्थ हुरुन इंडिया रिच लिस्ट 2021 मध्ये शिव नादर अँड फॅमिली तिसऱ्या स्थानावर आहे. त्यांची संपत्ती ६७ टक्क्यांनी वाढली आहे. आणि त्यांनी दररोज २६० कोटी रुपये कमावले आहेत. शिव नादर अँड फॅमिली २३६६०० कोटी रुपयांचे मालक आहेत.

एसपी हिंदुजा अँड फॅमिली २२०००० कोटी रुपयांसह यादीत चौथ्या क्रमांकावर आहेत. त्यांची संपत्ती ५३ टक्क्यांनी वाढली आहे. त्यांनी दररोज २०९ कोटी रुपये कमावले आहेत. पाचव्या क्रमांकावर एल एन मित्तल अँड फॅमिली आहे. त्यांची संपत्ती १८७ टक्क्यांनी वाढली. त्यांनी दररोज ३१२ कोटी रुपये कमावले. ते १७४४०० कोटी रुपयांचे मालक आहेत. सायरस एस पूनावाला आणि राधाकिशन दमानी सहाव्या आणि सातव्या स्थानावर आहेत. त्यांची मालमत्ता अनुक्रमे १६३७०० कोटी आणि १५४३०० कोटी रुपये आहे. विनोद अदानी हे यादीत आठव्या स्थानावर आहेत. नवव्या आणि १० व्या स्थानावर कुमार मंगल बिर्ला अँड फॅमिली आणि जय चौधरी अनुक्रमे १२२२०० आणि १२१६०० कोटी रुपयांच्या संपत्तीसह आहेत.

हेही वाचलत का :

Back to top button