सुरत-नाशिक-अहमदनगर-सोलापूर-चेन्नई ग्रीन फिल्ड रस्ता नगर जिल्ह्यातून जाणार असून हा देशातील महत्त्वाचा रस्ता आहे, अन्य रस्त्यांवरही वाहतूक कमी होईल, नगर यामुळे मुख्य प्रवाहात येईल. त्याभोवती जागा दिली तर आम्ही तेथे सोयी उभारू अशी ग्वाही केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिली.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते अहमदनगर जिल्ह्यामध्ये आज 3 हजार 28 कोटी महामार्गाचे भूमीपूजन तर 1 हजार 46 कोटी लोकार्पण सोहळा झाला. या कार्यक्रमासाठी शरद पवार, नितीन गडकरी आणि विखे पाटील कुटुंबीय उपस्थित होते.
या कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचीही उपस्थिती होती. अन्य राज्यात रस्त्याने लोक भेटतात, तेव्हा ते गडकरी यांची कृपा असल्याचे सांगतात असे सांगत शरद पवार यांनी गडकरी यांच्या कामाची भरभरून स्तुती केली.
यावेळी बोलताना नितीन इथेनॉल निर्मितीवर भाष्य केले. ते म्हणाले की, उसाच्या रसापासून आणि तांदळापासून इथेनॉल तयार करण्यास परवानगी देत आहोत. जशी रोपवाटिका केली जाते, तशी भरपूर दूध देणाऱ्या गायी तयार करण्याचा प्रकल्प उभारणार आहोत. त्या प्रकल्पातून जास्त दूध देणाऱ्या २०० गायी शेतकऱ्यांना देणार आहोत.
नगर जिल्ह्यात २३ साखर कारखाने आहेत, त्यामुळे नगरलाही या क्षेत्रात प्रगती करण्यास वाव असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. कोल्हापूर जिल्ह्याचा जीडीपी सर्वाधिक आहे, कारण तेथे जास्त साखर कारखाने असल्याचे ते म्हणाले.
आता उसापासून फक्त साखर तयार करून चालणार नाही, इथेनॉल, हायड्रोजन गॅस यांचे उत्पादन वाढवावे लागेल. यासाठी गडकरी करत असलेले काम नक्कीच मोठे आहे. लोकांची तशी मानसिकता करावी लागेल असा महत्त्वपूर्ण सल्ला यावेळी शरद पवार यांनी दिली.
पावसाचा फायदा असा की भूजल पातळी वाढली आहे. त्यामुळे आता उसाचे पीक वाढणार असल्याचे ते म्हणाले. राज्यात अतिवृष्टीमुळे हजारो हेक्टर पिकांचे नुकसान झाल्याचे त्यांनी सांगितले.
गडकरी कामे मंजूर करताना राजकारण पाहत नाहीत, मागणी काय आहे ते पाहतात. त्यामुळे सर्व पक्षाच्या लोकांची कामे होतात. अन्य राज्यात रस्त्याने लोक भेटतात, तेव्हा ते गडकरी यांची कृपा असल्याचे सांगतात. रस्ते, पिके व विकासाची परिस्थिती पाहायला मिळते. त्यामुळे मी शक्यतो रस्त्याने प्रवास करतो, असे पवार म्हणाले.
रस्ते वाहतूक ही सर्वसामान्यांसाठी महत्वाची असते, त्याला गती देण्याचे काम गडकरी करत असल्याचे ते म्हणाले. आजचा कार्यक्रम नगर जिल्ह्याला नवीन दिशा दाखविणारा असल्याचेही त्यांनी सांगितले.
हे ही वाचलं का?