लासलगाव, पुढारी वृत्तसेवा : मागील २० तासांहून अधिक काळ झालेल्या पावसाने लासलगाव येथील ग्रामीण रुग्णालय ४ फूट पाणी साचल्याने ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी आणि येथे उपचार घेत असलेले असे बारा जण मंगळवारी रात्री अडकले होते. पाण्याचा जोर वाढत असल्याने सर्व जण रुग्णालयाच्या टेरेसवर उभे होते सातत्याने सुरू असलेला जोरदार पाऊस तर खाली रुग्णालयाला नदीचे आलेले स्वरूप हे बघता अडकलेले नागरिक सुटकेसाठी प्रयत्न करत होते.
याबाबत माहिती मिळताच लासलगावचे सरपंच जयदत्त होळकर, वेदिका होळकर हे घटनास्थळी दाखल झाले. लासलगाव पोलीस स्टेशनचे सहा पोलीस निरीक्षक राहुल वाघ, पोलीस उपनिरीक्षक रामकृष्ण सोनवणे, विशाल पालवे, भैय्या नाईक, प्रतीक चोथानी आदींनी या सर्व अडकलेल्या १२ नागरिकांना मोठे प्रयत्न करून बाहेर काढले.
लासलगाव पोलीस स्टेशनचे सहा पोलीस निरीक्षक राहुल वाघ, पोलीस उपनिरीक्षक रामकृष्ण सोनवणे,पोलीस अंमलदार शिवाजी घोडे, योगेश शिंदे, संदीप शिंदे, प्रदिप आजगे, योगेश जामदार, देवा पानसरे, दत्तू शिंदे, भैय्या नाईक, ओम चोथानी, प्रतीक चोथानी, प्रकाश पाटील, विशाल पालवे, दत्ता पाटील,उमेश पारीक, मयुर बोरा,मिरान पठाण, संदीप उगले, जीवन पगार रोहित शेरेकर, सोनू शेख,शहादाब मयुर झाबरे, प्रदिप त्र्यंबके, अमोल थोरे,सुरज आबड,शिवाजी जगताप, मयुर गोसावी, मयूर विस्ते, सागर अहिरे आणि इतर अज्ञात तरुण यांनी आपला जीव धोक्यात घालून ग्रामीण रुग्णालय लासलगाव येथे शासकीय निवासस्थानमध्ये अडकलेल्या सहा महिला चार पुरुष व दोन बालक यांना आपल्या जीवाची पर्वा न करता सुखरूप पाण्याच्या बाहेर काढले.