केंद्र सरकारमुळे ओबीसी आरक्षण नाही; छगन भुजबळ यांची टीका | पुढारी

केंद्र सरकारमुळे ओबीसी आरक्षण नाही; छगन भुजबळ यांची टीका

जळगाव; पुढारी ऑनलाईन : केंद्र सरकारमुळे आज ओबीसी आरक्षण मुद्दा भिजत पडला आहे. ५० टक्के आरक्षण मर्यादा हा कोर्टाने दिलेला निर्णय आहे. केंद्र सरकार संसदेत कायदा करून हा निर्णय बदलू शकते मात्र, त्यांना तसे करायचे नाही, अशी टीका अन्नधान्य पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केली.

जळगाव येथे ओबीसी मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी त्यांनी केंद्र सरकार आणि भाजपवर टीका केली.

कोल्‍हापूर : इचलकरंजीत जुगार अड्ड्यावर छापा; २७ जणांना अटक

Beed Accident : कार अपघातात दोघेजण ठार, एक जखमी

ते म्हणाले, ओबीसीत एकजूट नसल्याने आजचा दिवस पहावा लागत आहे. आपल्यात एकजूट नसल्याने आपल्याला गृहीत धरले जात आहे. ओबसींना २००७ मध्ये आरक्षण मिळाले. ते आरक्षण २०१७ मध्ये काढून घेतले. यापुढे केवळ सरकारी खात्यांत नव्हे तर खासगी क्षेत्रातही आरक्षण मिळायला हवे.’

ते पुढे म्हणाले, सध्या भाजपमध्ये जे जाणार नाहीत त्यांच्या मागे तपासयंत्रणा लावल्या जातात. भाजपमध्ये सर्व काही माफ आहे. त्यामुळे घाबरलेले अनेकजण भाजपमध्ये गेलेत.’

हेही वाचा : 

Back to top button