लव्ह जिहादविरोधात त्र्यंबकेश्वरमध्ये हिंदू सकल मोर्चा | पुढारी

लव्ह जिहादविरोधात त्र्यंबकेश्वरमध्ये हिंदू सकल मोर्चा

त्र्यंबकेश्वर (नाशिक) : पुढारी वृत्तसेेवा 

नाशिकमध्ये लव्हजिहाद विरोधात काढण्यात आलेल्या हिंदू मूक मोर्चानंतर आज त्र्यंबकेश्वर येथेही हिंदू सकल मोर्चा काढण्यात आला. दिल्ली येथील श्रद्धा वालकर निर्घृण हत्या प्रकरणी निषेध करत लव्ह जिहादला प्रतिबंध करण्याच्या मागणीसाठी हिंदुत्ववादी संघटनानी त्र्यंबकेश्वर शहरातून विराट मोर्चा काढला.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास वंदन करून मोर्चाला सुरुवात झाली. मोर्चात संपूर्ण तालुक्यातून हजारो हिंदुत्वप्रेमी भगव्या टोप्या घालून सहभागी झाले. या मोर्चात साधू व महंताचाही मोठ्या प्रमाणात सहभाग होता. गर्दीवर नियंत्रण मिळविण्यासाठी मोठा पोलिस बंदोबस्त यावेळी करण्यात आला होता.

Back to top button