भाजपच्या आरोप करणाऱ्या नेत्यांनी समोरासमोर येवून चर्चा करावी : गोटे | पुढारी

भाजपच्या आरोप करणाऱ्या नेत्यांनी समोरासमोर येवून चर्चा करावी : गोटे

धुळे; पुढारी वृत्तसेवा : भारतीय जनता पार्टीच्या आरोप करणाऱ्या नेत्यांनी राज्यभरातील पत्रकारांच्या उपस्थितीत समोरासमोर येवून चर्चा करावी. यात पक्षातील चारीत्रवान व भ्रष्टाचार नेत्यांची सविस्तर माहिती देण्यास तयार असल्याचे खुले आव्हान भाजपचे माजी मंत्री राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष अनिल गोटे यांनी दिले आहे. विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर हे पक्षात नवीन असल्याने राजनिष्ठा सिध्द करण्यासाठी बेछुट आरोप करणे अरीहार्य असल्याची टिका देखिल यावेळी गोटे यांनी केली आहे.

भारतीय जनता पार्टीचे नेते विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्यासह भाजपकडून होत असलेल्या आरोपासंदर्भात आज माजी आमदार अनिल गोटे यांनी खुले आव्हान दिले आहे. दरेकर यांनी वारलेल्या वाक्यानुसार अशा नेत्यांचा भरणा कोणत्या पक्षात आहे, याची खुलेआम चर्चा करण्यास तयार असल्याचे गोटे यांनी म्हटले आहे.

बेछुट आरोप करणाऱ्यांनी भाजपच्या नेत्यांना प्रसिध्दीची हाव असून त्यांनी चारीत्र्यवान नेते आणि भ्रष्टाचार याविषयावर खुली चर्चा करण्यास आपली तयारी आहे. त्यासाठी राज्यभरातील पत्रकारांसमोर ही चर्चा करण्याची तयारी असल्याचे गोटे यांनी नमुद केले आहे. संदर्भहिन आरोप करणाऱ्यांनी देशातील महागाई व जनतेच्या महत्वाच्या प्रश्नावर बोलले पाहीजे.

आज देश महागाईमध्ये होरपळला जात आहे. कोरोनामुळे सर्वसाधारण जनतेचा रोजगार गेला असून महागाईमुळे जनता मेटाकुटीस आली आहे. काश्मिरपासून कन्याकुमारीपर्यंत निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी अडचणीत आला आहे. अशा परीस्थितीत शेतकऱ्यांच्या प्रश्नावर निगडीत असलेल्या दैनंदीन प्रश्नांवर भाजपचे वाचाळविर एकही शब्द बोलण्यास तयार नाही.

दैनंदिन जिवनातील प्रश्नांवरुन लक्ष विचलीत करण्यासाठी  मुख्यमंत्री बदला, सरकार पडणार आहे, ओबीसी व मराठा आरक्षणाचे प्रश्न उपस्थित करुन सामान्य जनतेचे लक्ष विचलीत करण्याचे उद्योग बंद केले नाही तर, आगामी निवडणुकांमध्ये त्यांना तिहेरी आकडा गाठणे कठीण होणार असल्याचा टोला माजी आमदार अनिल गोटे यांनी लगावला आहे.

हेही वाचलत का :

अभिनेत्री प्रार्थना बेहरे बनवतेय गणपती स्पेशल गाजराची खीर

Back to top button