मुंबईत उद्या फक्त महिलांसाठी लसीकरण; डोस विनानोंदणी घेता येणार | पुढारी

मुंबईत उद्या फक्त महिलांसाठी लसीकरण; डोस विनानोंदणी घेता येणार

मुंबई : पुढारी वृत्तसेवा

मुंबईतील सर्व शासकीय आणि महानगरपालिकेच्या लसीकरण केंद्रांवर उद्या शुक्रवारी, १७ सप्टेंबरला कोरोना प्रतिबंध लसीचे फक्त महिलांसाठी लसीकरण सत्राचे आयोजन करण्यात आले आहे. महत्त्वाची बाब म्हणजे थेट लसीकरण केंद्रावर जाऊन महिलांना सकाळी १०.३० ते सायंकाळी ६.३० या वेळेत कोरोना प्रतिबंधित लसीचा पहिला किंवा दुसरा डोस घेता येईल, अशी माहिती मुंबई मनपाने दिली आहे.

दरम्यान, फक्त महिलांना लस दिली जाणार असल्याने ऑनलाइन पूर्व नोंदणी बंद ठेवण्यात येईल, असेही मनपाने स्पष्ट केले आहे.

मुंबई मनपाने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईतील सर्व शासकीय आणि महानगरपालिका लसीकरण केंद्रांवर उद्या फक्त महिलांसाठी  लसीकरण सत्र राबवले जाणार आहे. ह्यात महिलांना थेट लसीकरण केंद्रावर येवून कोरोना लसीची पहिली किंवा दुसरी मात्रा घेता येईल. ह्या विशेष सत्राच्या कारणाने उद्यासाठीची ऑनलाइन पूर्व नोंदणी बंद ठेवण्यात येणार आहे.

Back to top button