कसबा सांगाव मध्ये मुश्रीफ-मंडलिक आघाडीत फूट सात सदस्यांचे राजीनामे | पुढारी

कसबा सांगाव मध्ये मुश्रीफ-मंडलिक आघाडीत फूट सात सदस्यांचे राजीनामे

कसबा सांगाव ; पुढारी वृत्तसेवा : कसबा सांगाव ( ता.कागल ) येथील विद्यमान उपसरपंच विक्रमसिंह जाधव व सात सदस्यांनी आपल्या पदाचे राजीनामे सरपंच रणजित कांबळे यांच्याकडे सुपूर्द केले. कसबा सांगाव ग्रामपंचायतीमध्ये मनमानी कारभार करत आपला अधिकार डावलल्याची भावना व्यक्त करत सदस्यांनीही राजीनामे सादर केले. यावेळी ग्रामविकास अधिकारी एस.पी कांबळे उपस्थित होते.

सकाळी दहाच्या सुमारास चावडी चौकात ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. चार वर्षांपूर्वी झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीत ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ व खासदार संजय मंडलिक यांनी एकत्रित आघाडी करत निवडणूक जिंकली होती.

ग्रामपंचायतीमध्ये सतरा सदस्य असून मुश्रीफ गटाचे लोकनियुक्त सरपंच रणजित कांबळे आहेत.

दरम्यान मंडलिक गटाचे उपसरपंच विक्रमसिंह जाधव, विरश्री जाधव, रंजना माळी, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राहुल हेरवाडे, दीपक हेगडे, सारिका मगदूम, तर भाजपच्या पद्मावती जाधव यांनी राजीनामे दिले आहेत.

तणावपूर्ण शांततेत सर्वपक्षीय कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक वाकचौरे, आर.आर.पाटील , रणजित कांबळे, मोहन माळुंगे, पोलीस पाटील छाया हेगडे यांनी मोठा पोलिस बंदोबस्‍त ठेवला होता.

हेही वाचलं का ? 

Back to top button