लक्झरी बस-ट्रक दुर्घटना : परिवहन आयुक्तांकडून घटनास्थळाची पाहणी | पुढारी

लक्झरी बस-ट्रक दुर्घटना : परिवहन आयुक्तांकडून घटनास्थळाची पाहणी

नाशिक (पंचवटी) : पुढारी वृत्तसेवा
राज्याचे परिवहन आयुक्त विवेक भीमनवार यांनी गेल्या आठवड्यात औरंगाबाद रोडवरील मिरची चौकात झालेल्या लक्झरी बस व ट्रकच्या झालेल्या अपघात घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

नाशिक परिक्षेत्रातील धुळे, नंदुरबार, मालेगाव, नगर, श्रीरामपूर प्रादेशिक परिवहन कार्यालयांच्या उपप्रादेशिक परिवहन अधिकार्‍यांच्या आढावा बैठकीसाठी ते नाशिकला आले होते. त्यानंतर सायंकाळी त्यांनी अपघातस्थळी भेट दिली आणि घटनास्थळाची पाहणी करत माहिती जाणून घेतली. त्यांच्या समवेत सहायक परिवहन अधिकारी जे. बी. पाटील, अधिकारी प्रदीप शिंदे, वासुदेव भगत, अलवारी आदी उपस्थित होते.

वराती मागून घोडे….
अपघात घडला त्याच दिवशी मुख्यमंत्री, पालकमंत्री, आमदार, खासदार, लोकप्रतिनिधींनी भेट दिली. त्यानंतर तीन दिवसाने केंद्रीय पथकाने पाहणी केली. नाशिक प्रादेशिक परिवहन विभागातील काही अधिकार्‍यांनी पोलिसांबरोबर संयुक्त पाहणी केली. मात्र, प्रादेशिक परिवहन आयुक्त विवेक भीमनवार यांच्या आढावा बैठकीच्या दिवशी अपघात स्थळाच्या पाहणीबाबत कुठलेही नियोजन नसल्याचे सांगून व आयुक्त पूर्ण दिवसभर आरटीओ कार्यालयात असतानादेखील अपघात घडल्याच्या आठ दिवसांनंतर रात्रीची अचानक पाहणी करून व त्यानंतर आजतगायत प्रादेशिक परिवहन कार्यालयातील अधिकार्‍यांनी नेमकं काय साधले हे अनाकलनीय आहे.

हेही वाचा:

Back to top button