स्टेपनी आहे; पण साहित्य नाही, एसटी महामंडळाचा कारभार वार्‍यावर | पुढारी

स्टेपनी आहे; पण साहित्य नाही, एसटी महामंडळाचा कारभार वार्‍यावर

जळगाव; पुढारी वृत्तसेवा: ‘लाल परी’ अशी एसटी ची महाराष्ट्रात ओळख आहे. त्यात सर्वाधिक म्हणजे, जी रस्त्यात बंद पडते स्वस्त असूनही महाग पडते अशी जीची अवस्था म्हणजे एसटी महामंडळ आहे. चालक, वाहक आणि बस आहे. मात्र, किती बस तंदुरुस्त आहे? आणि किती नादुरुस्त आहे? याचा कोणीच हिशोब करताना दिसत नाही.

आजची वेळ निघाली म्हणजे बस झालं, असाच कारभार एस.टी.  महामंडळाचा सुरू असल्याचं चित्र सध्या सर्वत्र दिसून येत आहे. बस पंचर झाल्यास स्टेफनी आहे. स्टेफनीसाठी लागणारे पाणी मात्र, बसमध्ये नाही, अशी काही अवस्था आज बुधवारी (दि. ८) रोजी पाचोरावरून जळगावला येणाऱ्या बसमध्ये प्रवाशांना अनुभवास आली.

सुरक्षित प्रवासाचे साधन असलेले व सर्वसामान्यांच्या सेवेसाठी जाईन तर बसनेच, प्रवाशांच्या सेवेसाठी या ब्रीद वाक्याने धावणारी सर्वसामान्यांची लालपरी आर्थिक डबघाईला आली आहे. आज पाचोरा डेपोतून एसटी बस जळगावकडे निघाली होती. मात्र, जळगावात येण्यापूर्वी वावळदा येथे पंक्चर झाली.

याचदरम्यान चालकाने एसटीमधून स्टेफनी काढली. परंतु, पंक्चर झालेले चाक काढण्यासाठी लागणारे इतर साहित्य बसमध्ये नव्हते.

या घटनेमुळे सर्व प्रवाशांचा खोळंबा झाला. यामुळे नोकरीवर येणारे सर्व उशिराने जळगावात पोहोचले.

यात बर्‍याच बसेसमध्ये स्टेपनी टायर नसतेच, असली तरी चाकाला असलेले नटबोल्ट काढण्यासाठी पाने वा आवश्यक साहित्यच उपलब्ध नसते.

त्यामुळे असून अडचण नसून खोळंबा अशी स्थिती एसटी महामंडळाची झाली आहे.

त्यामुळे वाटेवरच दुसरी बस येण्याची वाट पाहात प्रवाशांना थांबावे लागते.

दुसरी बस आली तरी, ती दुसर्‍या डेपोची असल्याने वेळेचा अपव्यय म्हणून साहित्य दिले जात नाही.

याचबरोबर वेळेवर देखभाल, दुरूस्ती न झाल्याने वारंवार वाटेतच बंद पडत आहेत.

प्रवाशांसाठी पर्यायी बस सोडली जात नसल्याने याचा मनस्ताप वाहक चालकांसह प्रवाशांना सहन करावा लागतो.

त्यामुळे एकेकाळी दिमाखात धावणारी लालपरी खर्‍या अर्थाने लाल डबा झाली आहे.

हेही वाचलंत का? 

Back to top button