कॅटरिना हिचे तुर्कीतून फोटो व्हायरल, एका हार्ट ईमोजीने उघड केलं प्रेमाचं रहस्य | पुढारी

कॅटरिना हिचे तुर्कीतून फोटो व्हायरल, एका हार्ट ईमोजीने उघड केलं प्रेमाचं रहस्य

मुंबई; पुढारी ऑनलाईन: बॉलिवूड अभिनेत्री कॅटरिना कैफ आणि बॉलिवूड अभिनेता सलमान खान आगामी ‘टायगर ३’ चित्रपटाच्या शूटिंगमध्ये बिझी आहे. ‘टायगर ३’ या चित्रपटाचे शुटिंग तुर्कीमध्ये सध्या सुरू आहे. याच दरम्यान कॅटरिनाने तुर्कीतून आपले काही हटके फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत.

कॅटरिना कैफ आणि सलमान खान आगामी ‘टायगर ३’ च्या शूटिंगसाठी सुमारे ३ महिने तुर्कीत आहेत. हा चित्रपट २०१२ मध्ये रिलीज झालेल्या कबीर खानच्या ‘एक था टायगर’ चा तिसरा सीझन आहे.

चित्रपटात सलमानने अविनाश सिंह राठोडची तर कॅटरिनाने जोयाची भूमिका साकारत आहेत. सलमान आणि कॅटसोबत या चित्रपटात इमरान हाश्मी दिसणार आहेत. कदाचित हा चित्रपट पुढच्या वर्षी रिलीज होणार आहे.

कॅटरिनाने नुकतेच आपल्या इंन्स्टाग्रामवर तुर्कीतील काही हटके आणि ग्लॅमरस फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत. या फोटोत कॅटरिना जांभळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये खूपच सुंदर दिसत आहे.

या फोटोसोहत तिने हार्टवाला ईमोजी शेअर केला आहे. यामुळे कॅट कोणाच्या तरी प्रेमात असल्याचे समजते. परंतु, याबाबतची अधिकृत्त माहिती मिळालेली नाही. हे फोटो व्हायरल होताच २२ लाखांहून अधिक लाईक्स आणि कॉमेंन्टस चाहत्यांनी केल्या आहेत.

आगामी ‘टायगर ३’ ची जोरदार तयारी सुरू

याशिवाय कॅटरिनाचा आणखी एक डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर खूपच व्हायरल होत आहे. यात कॅटरिना कोरियोग्राफर्ससोबत नवनविन डान्सच्या स्टेपस करताना दिसत आहे. या दरम्यान कॅटने पांढऱ्या रंगाचा स्लिव्हलेस टॉप आणि काळ्या रंगाची गेजिंग घातली आहे. या व्हिडिओवरून आगामी ‘टायगर ३’ ची जोरदार तयारी सुरू असल्याचे समजते.

यापूर्वी कॅटरिनाने रशियातून आपले फोटो आणि व्हिडिओ शेअर केले होते. यावेळी ती जांभळ्या रंगाचा टी-शर्ट आणि निळ्या रंगाच्या स्कर्टमध्ये दिसली होती. कॅटचा हा फोटोदेखील सोशल मीडियावर चाहत्यांच्या पसंतीस उतरला होता.

याशिवाय नुकतेच सलमान आणि कॅटरिनाने तुर्कीच्या पर्यटन मंत्र्याची भेट घेतली होती. हे फोटो देखील चाहत्यांना आवडले होते.

कॅटरिना नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असून फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. कॅटरिनाचे इंन्स्टा फॉलोअर्स लाखांच्या घरात आहे.

 

हेही वाचलंत का? 

 

View this post on Instagram

 

A post shared by Katrina Kaif (@katrinakaif)

 

View this post on Instagram

 

A post shared by Katrina Kaif (@katrinakaif)

Back to top button