

कोल्हापूर ; पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्र सरकारने ५ नोव्हेंबरपासून नाट्यगृहे सुरु होतील, असा निर्णय जाहीर केला आहे. त्यावर रंगाकर्मींनी नाराजी व्यक्त केली. आज सध्या कलाकारांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. शासनाने कलाकारांची थट्टा केली आहे. गेले दीड वर्षे झाले सांस्कृतिक कार्यक्रम बंद असल्याने कलाकाराची आर्थिक घडी बिघडली आहे. औषधाला सुद्धा कलाकारांच्याकडे पैसे नाहीत. सरकारच्या या निर्णयामुळे आता जगायचे कसे हा प्रश्न कलाकारांपुढे आवासुन राहिला आहे. सरकारला जाणीव करून देण्यासाठी रंगकर्मी कोल्हापूर यांच्यावतीने बुधवार (दि. ०८) पासून सांस्कृतिक कला बाजार सप्ताह मांडणार आहोत.
विविध राजकीय पक्षांचा राजकारणाचा बाजार तर राजरोसपने सुरु आहे. तेथे कोरोना बंधने नाहीत मग आमच्यावर बंधने का? याचा जाब विचारण्यासाठी संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहा समोरील रस्त्यावर मराठी गाणी, पथनाट्य, नृत्य, पोवाडा असे कला प्रकार सादर केले.
या कला बाजार सप्ताहाची सुरुवात करण्यात आली. या ठिकाणी कलाकारांसाठी मदतपेटी ठेवण्यात आली.
या नंतर प्रत्येक दिवशी सकाळी १० वा.बिंदू चौक, शिवाजी पुतळा चौक, रंकाळा चौपाटी, एस.टी.स्टँड, दसरा चौक, महाद्वार चौक या ठिकाणी कलाबाजार सादर करणार आहोत.
लवकरात लवकर सरकारने सांस्कृतिक कार्यक्रमांना परवानगी द्यावी तसेच नाट्यगृहे सुरू करावीत याकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी या सांस्कृतिक कला बाजार सप्ताह चे आयोजन करण्यात आले होते.
हेही वाचलं का ?