Nashik Bus Accident : अपघातातील जखमींची ‘ही’ आहेत नावे, आयुक्तांकडून जिल्हा रुग्णालयात पाहणी | पुढारी

Nashik Bus Accident : अपघातातील जखमींची 'ही' आहेत नावे, आयुक्तांकडून जिल्हा रुग्णालयात पाहणी

नाशिक : नाशिकमध्ये नांदूर नाक्‍याजवळ आज पहाटे खासगी बस आणि ट्रक यांच्यात भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये बसला भीषण आग लागली. या अग्नितांडवात संपूर्ण बस जळून खाक झाली आहे. या घटनेत 10 प्रवाशांचा मृत्‍यू झाला असून मृतांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या अपघातातील 29 जखमींवर नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे व मनपा आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी जिल्हा रुग्णालयात येऊन पाहणी केली. जखमींवर चांगले उपचार करावे, संसर्ग होणार नाही याची काळजी घेण्याच्या सूचना रुग्णालय प्रशासनास त्यांनी दिल्या आहेत. दरम्यान जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार आणखी एक मृतदेह आढळला आहे.

पहाटेच्या सुमारास हॉटेल मिर्ची येथील सिग्नलवर हा अपघात झाला. ट्रक (क्र. gj 05 bx 0226 ) धुळे हुन औरंगाबादच्या दिशेने जात होती तर बस (क्र. Mh29 aw 3100)  मुंबईच्या दिशेने जात होती. दोन्ही वाहने सिग्नल ओलांडत असताना ट्रकच्या इंधन टाकीजवळ बसची धडक बसली. त्यानंतर दोन्ही वाहने काही अंतर फरफटत गेली व छोटा हत्ती या वाहनावर धडकले. अपघातानंतर इंधनाचा भडका उडून बस पेटली. यात बस चालकासह एकूण दहा जण होरपळले. तर दोन लहान मुलासह एकूण 27 प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींमध्ये तिघांची प्रकृती गंभिर आहे. मृतांची ओळख पटलेली नसून DNA आणि ईतर फॉरेन्सिक टेस्ट करून ओळख पटवली जाईल असे जिल्हाधिकारी बी. गंगाथरन यांनी सांगितले. मदत कार्यासाठी प्रशासना मार्फत टोल फ्री नंबरही देत असल्याचेही त्यांनी सांगितले.

नियंत्रण कक्ष स्थापन

जखमी व मयत व्यक्ती विषयी अधिक माहिती संबंधितांना देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय आपत्ती व्यवस्थापन शाखा आणि जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या वतीने जिल्हा सामान्य रुग्णालय नाशिक येथे नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आले आहेत.  नियंत्रण कक्षा चे दुरध्वनी क्रमांक –
+912532572038
+912532576106
जिल्हाधिकारी कार्यालय नाशिक

अपघातातील जखमींची नावे

  1. अमित कुमार
  2. सचिन जाधव
  3. आश्विनी जाधव
  4. अंबादास वाघमारे
  5. राजु जाधव
  6. निलेश राठोड
  7. भगवान श्रीपत मनोहर
  8. संतोष राठोड
  9. हंसराज बागुल
  10. डॉ. गजकुमार बाबुलाल शहा
  11. त्रिशीला शहा
  12. भगवान भिसे
  13. रिहाना पठाण
  14. ज्ञानदेव राठोड
  15. निकिता राठोड
  16. अजय देवगण
  17. प्रभादेवी जाधव
  18. गणेश लांडगे
  19. पुजा गायकवाड
  20. आर्यन गायकवाड
  21. ईस्माईल शेख
  22. जयसुंबी पठाण
  23. पायल शिंदे
  24. चेतन मधुकर
  25. महादेव मारुती
  26. मालु चव्हाण
  27. अनिल चव्हाण
  28. दिपक शेंडे
  29. साहेबराव जाधव

 

Back to top button