जळगाव पाऊस : जिल्ह्यात पावसाची संततधार, प्रकल्पपातळीत वाढ | पुढारी

जळगाव पाऊस : जिल्ह्यात पावसाची संततधार, प्रकल्पपातळीत वाढ

जळगाव; पुढारी वृत्तसेवा :  जळगाव जिल्ह्यात दोन तीन दिवसांपासून पाऊस संततधार सुरू असून विविध प्रकल्प पाणलोट क्षेत्रात पाण्याची आवक होत असल्याने मध्यम लघूप्रकल्प पातळीत बर्‍याच प्रमाणात वाढ झाली आहे. जिल्ह्यातील हतनूर, गिरणा, वाघूर प्रकल्पांसह अन्य प्रकल्प पाणलोट क्षेत्रात गेल्या २४ तासात ११२ मि.मी पावसाची नोंद असून १८.६४ दलघमी पाण्याची आवक झाली आहे.

गिरणा प्रकल्पात ०.५३ दलघमी पाण्याची आवक झाली असून ४७.८५ तर वाघूर प्रकल्पात ७४.९१ टक्के साठा आहे. जिल्ह्यातील ९६ मध्यम लघू व ३ मोठया प्रकल्पात सरासरी ५२.४१ टक्के उपयुक्त साठा आहे. मध्यम प्रकल्पापैकी पाचोरा तालुक्यातील बहुळा प्रकल्पात तीन दिवसांपूर्वी केवळ २६ टक्के जलसाठा होता. त्यात तब्बल ६७ टक्क्यांहून अधिक पाण्याची आवक झाल्याने ९३.१० टक्के जलसाठा असून प्रकल्पाचे ९ गेट १० सेमी ने उघडून ३०५५ क्यूसेक पाण्याचा विसर्ग बहुळा प्रकल्पातून केला जात आहे. तर तापी नदी तसेच हतनूर प्रकल्पाचे ४ गेट पूर्ण तर २ गेट २ मिटरने उघडून २८हजार ७४० क्यूसेक पाण्याचा विसर्ग केला जात असल्याची माहिती प्रकल्प अभियंत्यांनी दिली.

प्रकल्पांतून पाण्याचा विसर्ग सुरु

गत सप्ताहात चाळीसगाव तालुक्यात ढगफुटीमुळे तितूर डोंगरी वा मांजरी नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली.त्‍याचबराेबर अतोनात नुकसान झाले आहे. दोन दिवसांपासून पुन्हा चाळीसगाव तालुक्यासह जिल्हा परिसरात पावसाची संततधार सुरू आहे. जिल्ह्यातील मोठ्या प्रकल्पांपैकी गिरणा प्रकल्प वगळता हतनूर, हिवरा, बहुळा, बोरी, मन्याड आदी प्रकल्पांतून पाण्याचा विसर्ग केला जात आहे. परिणामी गिरणेच्या उपनद्यांच्या नदीपात्रात होत असलेल्या विसर्गामुळे गिरणा पात्राची पाणीपातळीत वाढ होत आहे. त्यामुळेे जिल्ह्यातील गिरणासह अन्य नदीकाठच्या गावात सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून नागरिकांनी सावधानता बाळगावी, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राउत यांनी केले आहे.

जिल्ह्यातील हतनूर, गिरणा, वाघूर प्रकल्पांसह अन्य प्रकल्प पाणलोट क्षेत्रात गेल्या २४ तासांत ११२ मि.मी पावसाची नोंद असून १८.६४ दलघमी पाण्याची आवक झाली आहे. गिरणा प्रकल्पात ०.५३ दलघमी पाण्याची आवक झाली असून ४७.८५ तर वाघूर प्रकल्पात ७४.९१ टक्के साठा आहे. जिल्ह्यातील ९६ मध्यम लघू व ३ मोठया प्रकल्पात सरासरी ५२.४१ टक्के उपयुक्त साठा आहे. मध्यम प्रकल्पापैकी पाचोरा तालुक्यातील बहुळा प्रकल्पात तीन दिवसांपूर्वी केवळ २६ टक्के जलसाठा होता.

तब्बल ६७ टक्क्यांहून अधिक पाण्याची आवक झाल्याने ९३.१० टक्के जलसाठा असून प्रकल्पाचे ९ गेट १० से.मी.ने उघडून ३०५५ क्यूसेक तर बोरी प्रकल्पाचे ५ गेट ०.३० मीटर व २ गेट ०.१० मीटरने उघडून ५१५५ तसेच मन्याड प्रकल्प सांडव्यातून १२७६ क्यूसेकचा विसर्ग नदीपात्रात केला जात आहे. तसेच चाळीसगाव तालुक्यातील तितूर, डोंगरीसह अन्य नदीपात्रात पाण्याची आवक वाढली आहे. परिणामी गिरणा नदीपात्राची पाणीपातळीत वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे गिरणा, तापी, बोरी आदी नदीकाठच्या गावातील नागरिकांना सावधतेचा इशारा जिल्हा प्रशासनाने दिला आहे.

सायंकाळनंतर हतनूरमधून विसर्गात वाढ होणार

तापी नदी तसेच हतनूर प्रकल्प पाणलोट क्षेत्रात २९.८ मि.मी. पावसाची नोंद झाली असून ६४.०८ दलघमी पाण्याची आवक झाली आहे. त्यामुळे प्रकल्पाचे ४ गेट पूर्ण तर २ गेट २ मीटरने उघडून २८हजार ७४० क्यूसेक पाण्याचा विसर्ग केला जात आहे. पाण्याच्या आवकेत सतत वाढ लक्षात घेता सायंकाळनंतर प्रकल्पातून मोठ्या प्रमाणात विसर्गात वाढ करण्यात येणार आहे. त्यामुळे तापी नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असल्याचे प्रकल्प अभियंता जळगाव यांनी म्हटले आहे.

८१ टक्के पावसाची नोंद

जिल्ह्यात दमदार पावसाने हजेरी लावली आहे. बहुतांश ठिकाणी शेतांमध्ये तलावाचे स्वरूप प्राप्त झाले. शेतपिकांचे नुकसान देखिल झाले आहे. गेल्या २४ तासांत ११.३ मि.मी. पाऊस झाला असून आतापर्यत १००.४ मि.मीसह ८१.२ टक्के पावसाची नोंद झाली आहे. यात सर्वात जास्त पारोळा २३.३, जळगाव ७.५, भुसावळ १२.५, यावल ११.९, रावेर १७.१, मुक्ताईनगर १४.७, अमळनेर ४.०, चोपडा २.३, एरंडोल १४.९, चाळीसगाव ६.७, जामनेर २१.५, पाचोरा ८.४, भडगांव ७.४, धरणगांव ९.९, आणि बोदवड १२.८ मि.मी.सह ११.३ मि.मी.नुसार आतापर्यत १००.४ मि.मी म्हणजेच ८१.२ टक्के पावसाची नोंद झाली आहे.

हेही वाचलं का ?

SATERI MANDIR | कोल्हापुरातील पांडवकालीन सातेरी महादेव मंदिर

Back to top button