Ratnagiri Rain : दापोलीत रात्रभर पावसाचं थैमान! | पुढारी

Ratnagiri Rain : दापोलीत रात्रभर पावसाचं थैमान!

दापोली, पुढारी ऑनलाईन : दापोलीत (Ratnagiri Rain) रात्रभर मुसळधार पाऊस झाला असून शहरातील विविध ठिकाणी आणि मुख्य रस्त्यांवर पाणी साचलं आहे. दापोलीतीलकेळकर नाका, शिवाजीनगर, भारत नगर, नागर गुडी, प्रभू आळी, जालगाव खलाटी या परिसरात सुमारे पाच फुटाने पावसाचे पाणी वाढल्याने अनेक घरांमध्ये हे पाणी शिरलेले आहे. त्यामुळे रत्नागिरी आणि चिपळूण परिसरात एनडीआरएफचे २५ जवान आणि ४ बोटीसह पथक दाखल झालेले आहे.

रात्री एक वाजेपर्यंत पाऊस मोठ्या प्रमाणात असल्यामुळे पूर परिस्थिती कायम होती. त्यानंतर हळूहळू पाऊस कमी झाला आहे. चिपळुणमध्येही (Ratnagiri Rain) रात्रभर पाऊस कोसळत होता. सध्या चिपळूणमध्ये पाऊस थांबलेला आहे. पाणी पुन्हा घरांमध्ये शिरतं की, अशी परिस्थिती झाल्यामुले नागरिकांना रात्र जागून काढावी लागली. काही तास पावसाची रिपरिप सुरू राहणार असल्याने समुद्राच्या भरतीवेळी पाणी शहरात शिरण्याची सक्यता आहे. त्यामुळे प्रशासनाकडून सतर्कतेच्या इशारा देण्यात आला आहे.

काही दिवसांपूर्वी पावसाने दडी मारली होती. मात्र, पुन्हा त्याचं आगमन झालेले आहे. त्यामुळे पुढील चार-पाच दिवस रत्नागिरी, सिंधुदूर्ग जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता असल्याचे भारतीय हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे. त्याच बरोबर मुंबई, ठाणे या शहरांमध्येही मुसळधार आणि अतिमुसळधार पाऊस कोसणार असल्याची शक्यता आहे.

मंगळवारी समुद्रकिनारी पुन्हा एक बोट बुडाली आहे. यापूर्वी एक दिवस अगोदर आंजर्ले येथे एक बुडाली होती. त्या बोटीला वाचविण्यासाठी गेलेली बोट गाळात रुतून बसली. मात्र, ती बोट वाचली. आंजर्लेनंतर हर्णेत एका बोटीला जलसमाधी मिळाली आहे.मच्छीमारांकडून बोट वाचविण्याचे प्रयत्न करण्यात आले. मात्र, अखेर बोटीला जलसमाधी मिळाली.

पहा व्हिडीओ : दापोलीत ढगफुटी! मुख्य रस्त्यांवर साचलं पाणी

हे वाचलंत का? 

Back to top button