नाशिक : अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू | पुढारी

नाशिक : अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

नाशिक : अपघातातील जखमी दुचाकीस्वाराचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगेश विश्वनाथ बर्वे (३९, रा. ओमकार व्हिला, चाणक्यपुरी, म्हसरूळ) हे दुचाकीने पंचवटीकडून नांदूरनाक्याकडे जात होते. जनार्दन स्वामी मठाजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत बर्वे गंभीर ज‌खमी झाले होते. खासजी रूग्णालयात उपचार सुरू असताना बर्वे यांची प्राणज्योत मालवली. याप्रकरणी आडगाव पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

हेही वाचा :

 

Back to top button