पिंपळनेर (धुळे); पुढारी वृत्तसेवा : धुळे येथे दहिवेल येथील मराठी शाळेत प्लॉस्टिकचे तांदूळ आढळले. धुळे येथे दहिवेल (ता. साक्री) येथील जिल्हा परिषद मराठी मुलामुलींच्या शाळेमध्ये पंचायत समिती अंतर्गत मुलींना पोषण आहार वाटप करण्यात आला.येथील रविंद्र कुवर यांनी दहिवेल गटाचे जि. प. सदस्य खंडू कुवर, पंचायत समिती सभापती यांचे प्रतिनिधी पंकज सूर्यवंशी यांच्याकडे तक्रार केली होती. त्यांनी तत्काळ दहिवेल जिल्हा परिषद मराठी शाळेत जाऊन तांदळाची पाहणी केली.
सदर बाब लक्षात येता संबंधित जो कोणी अधिकारी, ठेकेदार असतील त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
अधिक वाचा-
यावेळी दहिवेल पं.स. सदस्य हिराबाई सोनवणे, रमेश सुर्यवंशी, गणेश गावित, एकनाथ सोनवणे,रविंद्र कुवर,रमेश बागुल,राजू भिल उपस्थित होते.
हेही वाचलं का?
पाहा व्हिडिओ – उमेश कामत आणि प्रिया बापटशी गप्पा | Umesh kamat and Priya bapat Exclusive #आणिकायहवं?