राजीव गांधी पुरस्कार आता राज्य सरकार देणार! सतेज पाटलांची माहिती

राजीव गांधी
राजीव गांधी

मुंबई; पुढारी ऑनलाईन : राजीव गांधी पुरस्कार : महाराष्ट्र सरकारने माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या नावाने पुरस्कार आणण्याची घोषणा केली आहे. ज्यांनी माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात उत्कृष्ट काम केले आहे त्यांना हा पुरस्कार दिला जाईल.

राजीव गांधी पुरस्कार महाराष्ट्र सरकारने हा पुरस्कार अशा वेळी जाहीर केला आहे जेव्हा केंद्राने राजीव गांधी खेल रत्न पुरस्काराचे नाव बदलून मेजर ध्यानचंद खेल रत्न पुरस्कार असे ठेवले आहे. महाराष्ट्राचे गृह राज्यमंत्री सतेज पाटील यांनी ट्विट करून ही माहिती दिली.

ते म्हणाले की,माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री म्हणून सांगताना मला अत्यंत आनंद होत आहे की, राज्यातील माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात उत्तम कामगिरी करणाऱ्या संस्थांना प्रोत्साहित करण्यासाठी माजी पंतप्रधान स्व. राजीव गांधीजी यांच्या नावाने आगामी वर्षीपासून दरवर्षी २० ऑगस्ट रोजी पुरस्कार दिला जाणार आहे..

दुसऱ्या ट्वीटमध्ये पाटील म्हणाले की, हा पुरस्कार स्वर्गीय श्री. राजीव जी यांच्या भारतातील तंत्रज्ञान क्षेत्रातील अमूल्य योगदानासाठी कायमस्वरूपी आदरांजली असेल.

जेव्हा भारतीय संघाने ऑलिम्पिकमध्ये हॉकीमध्ये कांस्य जिंकले, तेव्हा पंतप्रधान मोदींनी राजीव गांधी खेल रत्न पुरस्काराचे नाव बदलून हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांचे नाव देण्याची घोषणा केली.

तेव्हापासून काँग्रेससह अनेक विरोधी पक्ष सरकारच्या या निर्णयावर टीका करत होते. सरकारने खेळांच्या बहाण्याने राजकारण करण्याचा प्रयत्न केल्याचे विरोधकांचे म्हणणे आहे.

भाजपचा माजी सहयोगी आणि सध्या महाराष्ट्रात सरकारचे नेतृत्व करणाऱ्या शिवसेनेनेही या प्रकरणी मोदी सरकारवर टीका केली.

शिवसेनेने म्हटले होते की सरकारने राजीव गांधी खेल रत्न पुरस्काराचे नाव बदलू नये.

त्यांनी मेजर ध्यानचंद यांच्या नावाने आणखी एक मोठा पुरस्कार आणायला हवा होता.

कदाचित याच कारणामुळे महाराष्ट्र सरकारने राजीव गांधींवर पुरस्कार आणण्याची घोषणा केली असण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्रात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे महाविकास आघाडी सरकार आहे.

हे ही वाचलं का?

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news