नंदुरबार : मोटर सायकल चोरीच्या गुन्ह्यांमध्ये वाढ | पुढारी

नंदुरबार : मोटर सायकल चोरीच्या गुन्ह्यांमध्ये वाढ

नंदुरबार, पुढारी वृत्‍तसेवा : नंदुरबार जिल्ह्यात मोटर सायकल चोरीच्या गुन्ह्यांमध्ये वाढ झाली आहे. यामूळे नागरीकांमध्ये भितीचे  वातावरण निर्माण होवून पोलीसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न चिन्ह करण्यात आला हाेता. तथापि स्थानिक गुन्हे शाखेने कामगिरी बजावत दुचाकीच्या टोळीला गजाआड केले असून 10 लाख 80 हजार रुपयांच्या गाडया जप्त केल्‍या.

जालना : लाच स्वीकारताना वैद्यकीय अधिकारी ‘लाचलुचपत’च्या जाळ्यात

प्रभारी पोलीस अधीक्षकांनी मासिक गुन्हे बैठकीत मोटर सायकल चोरीच्या गुन्ह्यांचा नुकताच आढावा घेतला होता. त्या अनुषंगाने गुन्हेगारांवर कारवाई करणेबाबत त्‍यांनी निर्देश दिले. स्थानिक गुन्हे शाखेने चोरीच्या पद्धतीचा पूर्ण तपास करुन वारंवार चोरी होणारे ठिकाण, वेळ, दिवस किंवा चोरी होणारी विशेष कंपनीची मोटर सायकल यांची संपूर्ण माहिती घेतली. तर ज्या ठिकाणावरुन जास्त प्रमाणात मोटर सायकल चोरीस जातात त्याठिकाणी पाळत ठेवली.

धानोरा, गुजरभवाली व नंदुरबार जिल्ह्याला लागून असलेल्या गुजरात राज्यातील निझर तालुक्यातील रायगड व हातनुर येथील काही तरुणांचा यामध्ये समावेश आहे. हे तरूण नंदुरबार जिल्ह्यातून व गुजरात राज्यातून दुचाकी मोटर सायकल चोरुन नंदुरबार शहरातील कंजरवाडा येथील एका इसमास विक्री करण्यासाठी देतात.

दहा रुपयांवरून वीस रुपये भाव: अमावस्येला लिंबू, मिरची अन् बाहुली कापू लागली ‘खिसा’ !

सोमवारी (दि. 25) मध्यरात्री संशयीतांच्या घरी छापा टाकून चार संशयीतांना ताब्यात घेतले. नितेश किरण वळवी (वय 28 रा. मंदीरफळी धानोरा) , अविनाश जगदीश वसावा (वय-20 रा. सरपंच गल्लीच्या मागे, रायगड ), रोहित दास वळवी (वय-22 रा हातनुर ता. निझर ), कुंदन ऊर्फ सचिन राजेश पाडवी (वय 25 रा. गुजरभवाली ) अशी त्यांची नावे आहेत. त्या सर्वांनी मिळुन मागील काही दिवसांमध्ये नंदुरबार शहरातील मंगळ बाजार व गुजरात राज्यातील उमरा, वराछा, खटोदरा, वालोद, सुरत, ओलपाडा, पुनागाम इत्यादी ठिकाणाहून दुचाकी चोरल्‍या होत्‍या.

पोलिसांनी आरोपींची कसून चौकशी केल्‍यानंतर चोरी केलेल्या दुचाकी ते नंदुरबार कंजरवाडा येथील राहुल संजय अभंगे (वय-21 रा. कंजरवाडा) यास विक्रीसाठी देणार होते. तसेच राहुल यास ज्या मोटर सायकली पाहिजे असल्यास त्या मोटर सायकल आम्ही चोरी करतो, असे आरोपींनी सांगितले. त्‍यानंतर अभंगे यास ताब्यात घेतले. तर पाचही आरोपींना अटक करण्यात आलेली असून त्यांच्याकडून एकुण 10 लाख 80 हजार रुपये किंमतीच्या 19 दुचाकी जप्त केल्‍या आहेत. पोलिसांनी आरोपींना न्यायालयात हजर केले. दरम्‍यान न्यायालयाने पाचही आरोपींना पोलीस कोठडी सुनावली आहे.

हेही वाचा

Back to top button