

मुंबई, पुढारी ऑनलाईन : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक हल्ल्याप्रकरणी ॲड. जयश्री पाटील यांचा अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला आहे. मुंबई सत्र न्यायालयाने त्यांच्या जामीन अर्जावरील सुनावणीदरम्यान हा निर्णय आज (शनिवार) दिला.या निकालामुळे जयश्री पाटील यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
शरद पवार यांच्या निवासस्थानावर ८ एप्रिल रोजी एसटी कर्मचाऱ्यांनी दगडफेक करत हल्ला केला होता. या प्रकरणी जयश्री पाटील यांच्यावर आरोप ठेवण्यात आला होता. मागील सुनावणीवेळी त्यांना अटकेपासून अंतरिम दिलासा मिळाला होता. शुक्रवारी (दि.२९) त्यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर युक्तिवाद पूर्ण झाला. या प्रकरणातील १११ आरोपींसह आरोपी वकील गुणरत्न सदावर्ते यांनादेखील मुंबई सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला होता. सर्व आरोपी जामिनावर सुटले आहेत. आता जयश्री पाटील यांनाही अटकपूर्व जामीन मिळाल्याने त्यांना दिलासा मिळाला आहे.
हेही वाचलंत का ?