दहा रुपयांवरून वीस रुपये भाव: अमावस्येला लिंबू, मिरची अन् बाहुली कापू लागली ‘खिसा’ !
बीड : गजानन चौकटे
उन्हाळा सुरू झाला की, दरवर्षी लिंबूचे भाव वाढतात. मात्र यंदा लिंबूचे भाव गगनाला भिडले आहेत. याचा परिणाम फक्त लिंबू सरबतावरच नाही तर अमवस्येला बांधल्या जाणाऱ्या लिंबू मिरचीवरही झाला आहे. अनेक दुकानांवर वाहनांवर आणि घराच्या गेटवर लिंबू मिरची लटकवतात. काहीजण याला अंधविश्वास मानतात तर काही जण रूढी परंपरेनुसार लिंबू मिरची बांधतात असं म्हटलं जातं. दोन महिन्यापूर्वी लिंबू मिरची हे दहा रुपयाला विकत मिळत होती परंतु आता लिंबूचे भाव गगनाला भिडल्यामुळे आता त्याची किंमत वीस रूपये झाले आहे.
अमावस्या व शनिवारी लिंबू-मिरची बदलतात
बीड मधे लिंबू-मिरचीचे विक्रेते जास्त आहे यामुळे परगावातील लिंबू-मिरची विक्रेते हे बीड वरून अनेक ठिकाणी बाजारपेठेत विक्री साठी घेऊन येत असतात फार कमी लोक हा लिंबू मिरची तयार करतात, पण, हे फक्त बीड जिल्ह्यातच नव्हे तर इतर ठिकाणी देखील विकण्यात येतात. विक्रेते हे बीडमधून गेवराई व इतर ठिकाणी येथे एसटीने जाऊन तिथे पायी किंवा सायकलच्या मदतीने लिंबू मिरची यांची विक्री करतात. विविध वस्तूचे वाढलेले भाव म्हणून आम्हांला देखील साहित्य महाग भेटते म्हणून विक्रीसाठी येणाऱ्या बाहुलीची (लिंबू मिरचीसहीत) किमत देखील २० रुपयांवरून ४० रुपये झाली आहे. सध्या लिंबू ८० ते १०० झाले आहे. पण, लिंबू महाग झाल्याने त्याची किंमत आता वीस रुपये झाली आहे. तर घरावर बांधण्यात येणाऱ्यांची जास्त किंमत आहे.
लिंबू मिरची बांधण्याची प्रथा कशी सुरु झाली?
- लोक बैलगाडीतून प्रवास करीत असत. मैलोमैलाच्या ह्या प्रवासात बैलगाडीला लिंबू , मिरची , बिब्बा हा एका टोकदार तारेत ओवून गाडीच्या अश्या भागात बांधत की तो लगेच लोकांचा निदर्शनात पडेल. प्रत्येक घराच्या बाहेर हे टांगले जात असे जेणे करून घरासमोरून जाणाऱ्या वाटसरूना तो लगेच मिळेल.
- मैलोन मैल चालत असताना माणसाला तहान लागल्यास पाणी उपलब्ध न झाल्यास लिंबू तोंडात पिळून तोंडात लाळ निर्माण करण्यात येते ज्यामुळे माणसाची तहान तात्पुरती क्षमावता येवू शकते.
- त्याकाळी साप, नाग यांचा वावर फार मोठा होता, म्हणून चालत जाताना एखादा साप चावल्यास त्याला मिरची खायला देत जेणे करून हा साप विषारी होता कि बिनविषारी ह्याची माहित मिळे . साप चावला असताना मिरची तिखट लागली तर साप बिनविषारी होता आणि तिखट नाही लागली कि साप हा विषारी होता, असा अंदाज बांधला जात असे.
- बिब्बा हा उत्कृष्ट एंटीबायोटीक समजला जातो म्हणून जखम झाल्यास, कापल्यास बिब्बा लावला जात असे आणि हे सगळे एका टोकदार तारेत ओवले जात असे जी तार पायातला काटा काढण्यास उपयोगात येई.
- अश्या प्रकारे हा प्रथोमपचार बैलगाडीवर, घराच्या दर्शनी भागात लावला जात कारण त्याचा उपयोग प्रथमोपचारासाठी होई. पुढे वाहने आली आणि हा प्रथमोपचार एक अंधश्रद्धा बनून अजूनही सुरु आहे.
दर शनिवार व अमावस्येला ठरलेल्या दुकानात व घरी आम्ही जातो. सध्या लिंबू महाग झाल्यामुळे लिंबू मिरची, बाहुलीची किंमत वाढली आहे. पण, कुणीही विरोध न करता आमच्याकडून खरेदी करतात व आमचा उदरनिर्वाह यावरच अवलंबून आहे.
– रामलाल पवार, लिबू-मिरची विक्रेते

