जालना : लाच स्वीकारताना वैद्यकीय अधिकारी ‘लाचलुचपत’च्या जाळ्यात | पुढारी

जालना : लाच स्वीकारताना वैद्यकीय अधिकारी 'लाचलुचपत'च्या जाळ्यात

जालना; पुढारी वृत्तसेवा : वडीगोद्री येथील वैद्यकीय अधिकारी यांनी समुदाय आरोग्य अधिकारी पती – पत्नीचे सुट्टीच्या दिवसांचे बिल काढण्यासाठी २२०० रुपये लाचेची मागणी केली. ही लाच स्वीकारताना वैद्यकीय अधिकाऱ्याला वडीगोद्री प्राथमिक आरोग्य केंद्रात रंगेहाथ पकडण्यात आले. डॉ. सुशिल प्रभाकर जावळे (वय ३४) असे अटक केलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्याचे नाव आहे. ही कारवाई आज (दि.३०) दुपारी २ च्या दरम्यान लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने सापळा रचून केली.

याबाबत अधिक माहिती अशी की, तक्रारदाराचे आणि त्याच्या पत्नीचे सुट्टीच्या दिवसांचे बिल काढण्यासाठी दररोज दोनशे रुपयेप्रमाणे दोघांचे चालू महिन्यातील सहा दिवसांचे १२०० रुपये. तर मागील महिन्यातील पाच दिवसांचे १००० रुपये असे एकूण २२०० रुपयांची मागणी  डॉ. सुशिल जावळे यांनी तक्रारदाराकडे केली होती. याबाबतची माहिती तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंध विभागाला दिली. त्यानंतर लाच  स्वीकारताना जावळे यांना सापळा लावून रंगेहाथ पकडण्यात आले. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. सदर कारवाई अधिकारी शकील शेख, मनोहर खंडागळे, गणेश चेके, जावेद शेख, ज्ञानेश्वर म्हस्के, गजानन कांबळे, प्रवीण खंदारे यांनी केली.

  हेही वाचलंत का ? 

Back to top button