

पुढारी ऑनलाईन डेस्क : लोकसभा निवडणूक २०२४ मध्ये होणार असली तरी आतापासून राजकीय पक्ष व विश्लेषकांमध्ये यावर खल सुरु आहे. आता आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपचा पराभव कोण करणार? या प्रश्नावर निवडणूक रणनितीकार प्रशांत किशोर यांनी आपले मत मांडले आहे.
लोकसभा निवडणुकीत भाजपचा पराभव करायचा असेल तर तिसरी व चौथी आघाडी उपयोगाची नाही. भाजपविरोधी पक्षांनी एकत्रीत येवून स्थापन केलेली दुसरी आघाडीच भाजपला पराभूत करु शकेल, असे प्रशांत किशोर यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखातीत म्हटलं आहे.
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी २०२४च्या लोकसभा निवडणुकीत तिसरी आघाडी स्थापन करण्याचे संकेत दिले आहेत. यावर मत व्यक्त करताना प्रशांत किशोर म्हणाले की, भारतात तिसरी अणि चौथी आघाडी लोकसभा निवडणूक जिंकतील, असे मला वाटत नाही. भाजप ही देशातील पहिल्या क्रमाकांची आघाडी असेल तर भाजपविरोधी सर्व पक्षांनी एकत्रीत येवून दुसरी आघाडी स्थापन करावी. तरच भाजपचा पराभव होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी त्यांनी काँग्रेस पक्ष हा देशातील दुसरी आघाडी आहे का, अशी विचारणा करत काँग्रेस हा देशातील दुसर्या क्रमांकाचा पक्ष असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रशांत किशोर यांनी नुकतीच काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याबरोबर आगामी लोकसभा निवडणुकीसंदर्भात चर्चा केली होती. यानंतर ते काँग्रेस पक्षात प्रवेश करतील, अशी चर्चा रंगली होती. मात्र त्यांनी याला नकार दिला. प्रशांत किशोर यांनी ट्विट करून म्हटले होते की, निवडणुकीत जबाबदारी स्वीकारण्यासाठी काँग्रेसने दिलेली प्रवेशाची ऑफर मी विनम्रपणे नाकारत आहे. पक्षात सखोल पारदर्शक सुधारणा घडवून आणण्यासाठी माझ्यापेक्षाही अधिक पक्षाला सामूहिक नेतृत्वाची गरज आहे.
हेही वाचा :