सातारा : अज्ञात वाहनाच्या धडकेत विद्यार्थिनीचा जागीच मृत्‍यू; एक जखमी | पुढारी

सातारा : अज्ञात वाहनाच्या धडकेत विद्यार्थिनीचा जागीच मृत्‍यू; एक जखमी

मायणी; पुढारी वृत्तसेवा :  मायणी पक्षी आश्रयस्थान परिसरात मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या मुलींना अज्ञात वाहनाने धडक दिली. या अपघातात इयत्ता बारावीची परीक्षा दिलेली विद्या राजकुमार हिंगसे (वय १८) हिचा जागीच मृत्‍यू झाला.

तिच्यासोबत असणारी दिव्या काशिनाथ तोडकर (वय १५) ही गंभीर जखमी झाली. तिला रुग्‍णालयात दाखल केले आहे.

घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, नवी पेठेतील मुली व काही महिला मॉर्निंग वॉकसाठी मायणी पक्षी आश्रयस्थान परिसरात पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास गेल्या होत्या.

मॉर्निंग वॉक वरून परतत असताना हा अपघात झाला.

म्हसवड व कलेढोणकडे जाणाऱ्या रस्त्याच्या तिखाटण्याच्या वळणालगत कलेढोण कडून मायणीकडे जाणाऱ्या अज्ञात दुचाकीस्वाराने त्‍यांना पाठीमागून जोरदार धडक दिली.

या अपघातामध्ये विद्या हिंगसे हिच्या डोक्याला जोरदार मार लागला. मोठा रक्तस्त्राव झाल्याने ती जागीच ठार झाली.

यावेळी तिच्‍यासाेबत दिव्या तोडकर ही गंभीर जखमी झाली.

त्यांच्यासोबत असलेल्या मुलींनी दुचाकीस्वाराला पकडून ठेवण्याचा प्रयत्न केला.

मात्र जखमी झालेल्या मुलींच्‍या मदतीसाठी त्‍या धावून गेल्या तेवढ्यात अज्ञात दुचाकीस्वाराने घटनास्‍थळावरून पोबारा केला.

पाहा व्‍हिडीओ :  या किल्‍ल्‍याची तटबंदी सावरणार काेण? 

Back to top button