‘जोधा अकबर’ फेम लोकेंद्र सिंह राजावत यांना कापावा लागला पाय

‘जोधा अकबर’ फेम लोकेंद्र सिंह राजावत यांना कापावा लागला पाय
Published on
Updated on

मुंबई; पुढारी ऑनलाईन : 'जोधा अकबर' फेम लोकेंद्र सिंह राजावत यांना तणाव आणि शुगरचे प्रमाण वाढल्याने पाय कापावा लागला आहे. 'जोधा अकबर' या मालिकेत लोकेंद्र सिंह राजावत यांनी 'शमसुद्दीन अटागा खान'ची भूमिका साकारली होती. लोकेंद्र यांच्यावर मुंबईतील भक्तिवेदांत हॉस्पिटलमध्ये पाच तास शस्त्रक्रिया करण्यात आली होती.

नुकतेच दिलेल्या एका मुलाखतीत लोकेंद्र राजावत यांनी झालेली शस्त्रक्रिया आणि आर्थिक परिस्थितीबाबत खुलासा केला. यात त्यांनी 'माझ्या उजव्या पायाला गाठ आलेली आणि त्याकडे मी दुर्लक्ष केले. इथूनच या दुखापतीला सगळी सुरुवात झाली. गाठीचा संसर्ग माझ्या शरीरात पसरला आणि गँगरीनची समस्या उद्भविली. यानंतर माझा जीव वाचवायचा असेल तर उजवा पाय गुडघ्यापर्यंत कापणे हा एकच पर्याय उरला होता.' असेही सांगितले.

आरोग्याच्या समस्यांचा खर्च करताना माझी दमछाक

यापुढे त्यांनी 'कोरोना व्हायरस आणि लॉकडाऊनमुळे आरोग्याच्या समस्यांचा खर्च करताना माझी दमछाक होत होती. त्यावेळी मी काहीही करू शकत नव्हतो. कोरोना महामारी पसरण्यापूर्वी माझं काम चांगलं चालू होतं. मात्र, लॉकडाउनमध्ये घरात आर्थिक समस्या जाणवू लागल्या.'

यापुढे जावून त्यांनी स्वत:चे आरोग्य जपणं किती महत्त्वाचं असतं हे देखील या मुलाखतीत स्पष्ट केले. 'आता विचार करतो जेव्हा १० वर्षांपूवी मधुमेहाबद्दल माहिती झाले होते तेव्हाचं काळजी घ्यायला हवी होती. खाण्या- पिण्याकडे माझे दुर्लक्ष होत गेले आणि सतत कामात व्यस्त असल्याने आरोग्याकडे दुर्लक्ष झाले. यामुळे हे संकट माझ्यावर ओढवले.' असेही ते म्हणाले.

या दरम्यान लोकेंद्र यांना 'सिंटा'कडून मला आर्थिक मदत मिळाली होती. तसेच मराठी अनेक कलाकारांनी तब्येतीची विचारपूस करण्यासाठी मला फोन केला असल्याचे देखील त्यांनी सांगितले.

लोकेंद्र सिंह राजावत यांनी 'जोधा अकबर' याशिवाय 'सीआइडी', 'क्राइम पेट्रोल' अणि 'ये है मोहब्बतें' मालिकेत दिसले. अनुराग बासू दिग्दर्शित 'जग्गा जासूस' आणि संजय लीला भन्साळी दिग्दर्शित 'मलाल' या चित्रपटांमध्ये त्यांनी भूमिका साकारल्या होत्या.

हेही वाचलंत का? 

पाहा : कवयित्री बनलेल्या प्राजक्ता माळीशी दिलखुलास संवाद 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news