

कठुआ ; पुढारी ऑनलाईन : Indian army helicopter crashes : जम्मू- काश्मीरच्या कठुआमध्ये असलेल्या रणजीत सागर धरणाजवळ भारतीय जवानांचे हेलिकॉप्टर कोसळले. बचावपथक घटनास्थळी दाखल झाले असून बचावकार्य सुरू आहे. जीवितहानीबाबतची कोणतीही माहिती समोर आली नाही.
२५४ आर्मी एव्हिएशन स्क्वाड्रनचे हेलिकॉप्टर सकाळी १० वाजून २० मिनिटांनी मामून कँटमधून हेलिकॉप्टरने उड्डाण केले होते.
रणजीत सागर धरण परिसरात हेलिकॉप्टर कमी उड्डाण (Indian army helicopter crashes) करत असताना कोसळले, असे सांगितले जात आहे.
कठुआ जिल्ह्याचे एसएसपी आर सी कोतवाल यांच्या माहितीनुसार, बचावपथक घटनास्थळी पाठवण्यात आले आहेत.
या हेलिकॉप्टरमध्ये किती लोक होते याची माहिती मिळाली नाही.
घटनेची माहिती मिळताच एनडीआरएफची टीम धरण परिसरात पोहोचली. सध्या पाणबुड्यांच्या मदतीनं धरणात बचावकार्य सुरू आहे.
हेलिकॉप्टरमध्ये किती जण होते, हा अपघात नेमका कसा झाला याबद्दलची माहिती अद्याप समोर आलेली नाही. या वर्षाच्या सुरुवातीलादेखील लष्कराचं एक हेलिकॉप्टरमध्ये जम्मूमध्ये दुर्घटनाग्रस्त झालं. त्यात दोन पायलट होते. त्यातल्या एकाचा मृत्यू झाला.