धुळे : शहर ‘बंदचा’ मॅसेज व्हायरल करणाऱ्या 8 जणांविरोधात गुन्हा दाखल | पुढारी

धुळे : शहर 'बंदचा' मॅसेज व्हायरल करणाऱ्या 8 जणांविरोधात गुन्हा दाखल

धुळे पुढारी वृत्तसेवा : साक्री शहरातील दोन गटात झालेल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडिया वरून शहर बंद करण्याचे आवाहन करणाऱ्या आठ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या मेसेजच्या माध्यमातून जातीय तेढ वाढवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप या तक्रारीत करण्यात आला आहे.

साक्री शहरांमध्ये धुलिवंदनाच्या दिवशी दोन गटांमध्ये हाणामारी झाल्याची घटना घडली होती. या घटनेमुळे साक्रीत तणावाचे वातावरण तयार झाले. मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून हा तणाव दुर केला. दरम्यान याच दंगलीच्या पार्श्‍वभूमीवर सोशल मीडिया वरून साक्री बंदचे आवाहन व्हायरल झाल्यामुळे काल साक्री शहर कडकडीत बंद पाळण्यात आला. या बंदच्या पार्श्वभूमीवर पोलिस अधीक्षक प्रवीणकुमार पाटील आणि साक्री पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी सोशल मीडिया वरून बंदच्या मॅसेज व्हायरल झाल्याच्या प्रकाराची चौकशी सुरू केली.

त्यानुसार पोलीस कॉस्टेबल संजय शिरसाट यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार छडवेल कोरडे येथे राहणारे अॅड विशाल पिंपळे तसेच साक्री येथील साजन सुरेश घुगे, युवराज महाले, पराग चौधरी, कार्तिक रामोळे, मनीष ढोले, प्रवीण शर्मा, दीपक चौधरी यांच्या विरोधात दिलेल्या तक्रारीनुसार भादवि कलम 153 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या तक्रारी मध्ये सोशल मीडिया वरून व्हाट्सअप पोस्ट प्रसारित करून शहरातील दोन समाजात तेढ निर्माण करुन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करण्याच्या हेतूने ही पोस्ट केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

हेही वाचा :

Back to top button