बेळगाव I सर्व मंदिर परिसरात मुस्लिमांना दुकाने थाटण्यास परवानगी देण्यात येवू नये : श्रीराम सेना | पुढारी

बेळगाव I सर्व मंदिर परिसरात मुस्लिमांना दुकाने थाटण्यास परवानगी देण्यात येवू नये : श्रीराम सेना

बेळगाव; पुढारी वृत्तसेवा : जोपर्यंत गोहत्या करणे, गोमांस खाणे ही मुस्लिमांची मानसिकता बदलत नाही. तोपर्यंत त्यांच्यासोबत कोणत्याही प्रकारचा व्यापार, व्यवहार करण्यात येवू नये. सौंदत्ती यल्लम्मासह जिल्ह्यातील सर्व मंदिर आवारात मुस्लिमांना दुकाने थाटण्यास परवानगी देण्यात येवू नये, यासाठी आंदोलन छेडण्यात येणार आहे, अशी माहिती श्रीराम सेनेचे संस्थापक प्रमोद मुतालिक यांनी गुरुवारी (दि. 24) पत्रकार परिषदेत दिली.

ते म्हणाले, मुस्लिम दुकानदारांविरोधात सौंदत्ती यल्लाम्मा, पंतबाळेकुंद्री आणि होळेम्मादेवी मंदिर आवारात आंदोलन करण्यात येणार आहे. लवकरच सर्व मंदिर आवारांत मुस्लिमांना व्यापार करण्यास बंदी असल्याचे फलक लावण्यात येणार आहेत. आमची कृती कायदेशीर आहे. कायद्यानुसार हिंदू मंदिरांपासून शंभर मीटर आवारात कोणत्याही इतर धर्मियांनी व्यापार करू नये, अशी तरतूद आहे. सरकारने त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करणे आवश्यक आहे.

यावेळी श्रीराम सेनेचे रविकुमार कोकितकर, विनय अंग्रोळी आदी उपस्थित होते.

मळेकरणीला हलाल कशासाठी ?

उचगाव येथील मळेकरणी देवीची दर मंगळवार आणि शुक्रवारी यात्रा होत असते. या यात्रेत बकर्‍यांचा बळी दिला जातो. आमची देवी असली तर मुस्लिमांनी हलाल करणे, त्यासाठी त्यांना पैसे देणे हे चुकीचे आहे. याबाबतही जागृती करण्यात येणार आहे, असेही प्रमोद मुतालिक यांनी सांगितले.

हे ही वाचलं का ?

Back to top button