पुणे विमानतळाचे स्थलांतर नाही; खासदार गिरीश बापट यांची माहिती | पुढारी

पुणे विमानतळाचे स्थलांतर नाही; खासदार गिरीश बापट यांची माहिती

पुणे : पुढारी वृत्तसेवा

पुणे विमानतळाचे स्थलांतर अजिबात करणार नाही. येथेच प्रवाशांच्या सुविधेसाठी वाढ करण्यात येणार आहे, असे विमानतळ सल्लागार समितीचे अध्यक्ष आणि खासदार गिरीश बापट यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

गुरुवारी सकाळी विमानतळ प्रशासन आणि खासदार गिरीश बापट यांच्याकडून नव्या विमानतळ टर्मिनलबाबत माहिती देण्यासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी ते बोलत होते. खासदार बापट यांच्यासह विमानतळ प्रशासनातील अधिकारी वर्ग उपस्थित होते.

यावेळी बापट म्हणाले, पुणे विमानतळ हे प्रवाशांच्या सोयीच्यादृष्टीने मध्यवर्ती भागात आहे. त्यामुळे हे विमानतळ हलविण्याचा आमचा कोणताही विचार नाही. असे म्हणताना त्यांनी पुरंदर, बारामती येथे नवे विमानतळ उभारण्याच्या चर्चांना खंडीत केले.

यावेळी विमानतळ प्रशासनातील अधिकाऱ्यांनी नव्या विमानतळ टर्मिनलची पत्रकारांना माहिती दिली. प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर नव्या विमानतळाचे काम सुमारे ६८ टक्‍क्‍यांपर्यंत पूर्ण झाल्याचे पाहायला मिळाले.

Back to top button