पोषण अभियानात नाशिक राज्यात तिसरे ; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार सन्मान | पुढारी

पोषण अभियानात नाशिक राज्यात तिसरे ; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार सन्मान

नाशिक : पोषण अभियान जनआंदोलन कार्यक्रमात नाशिक जिल्ह्याने राज्यात तृतीय क्रमांक पटकावला आहे. याबाबत महिला दिनी (दि. 8) मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारण्यासाठी नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी महिला व बालविकास विभागाच्या कार्यक्रम अधिकार्‍यांसह उपस्थित राहण्याबाबत महिला व बालविकास विभाग आयुक्त रुबल अग्रवाल यांनी कळविले आहे.

महिला व बालविकास विभागातर्फे येत्या 8 मार्चला कोविड काळात सर्वेात्कृष्ट काम करणारे अधिकारी व कर्मचारी यांचा सन्मान मुख्यमंत्री, महसूलमंत्री, महिला व बालविकास मंत्री यांच्या प्रमुख उपस्थितीत सह्याद्री अतिथीगृह येथे करण्यात येणार आहे.

पोषण अभियान जनआंदोलन कार्यक्रम राबविणार्‍या जिल्ह्यांमध्ये नाशिक जिल्ह्याने तिसरा क्रमांक मिळविला आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड व कार्यक्रम अधिकारी दीपक चाटे यांना या कार्यक्रमास उपस्थित राहण्याबाबत कळविले आहे.

हेही वाचा :

Back to top button