नाशिक : पती-पत्नीच्या भांडणात शालकाचा खून | पुढारी

नाशिक : पती-पत्नीच्या भांडणात शालकाचा खून

मालेगाव (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा बहिणीला मारहाण करणार्‍या मेहुण्याला समजावून सांगण्यासाठी गेलेल्या शालकांवरच मेहुण्याने प्राणघातक हल्ला केला. चाकूच्या गंभीर वाराने मोठा भाऊ जखमी झाला, तर लहान भावाचा मृत्यू झाला. नवरंग कॉलनीतील हबीमुल्ला मशिदीसमोर शनिवारी सायंकाळी हा प्रकार घडला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोबीन अहमद मुयोद्दीन (44, रा. नया इस्लामपुरा) यांनी पवारवाडी पोलिस ठाण्यात मेहुणा मो.  इम्रान उस्मान गणी (रा. नवरंग कॉलनी) यांच्याविरोधात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार, शनिवारी इम—ानने पत्नीला बेदम मारहाण केली. त्याला समजविण्यासाठी मोबीन हे बंधू मोहम्मद मुयीद्दीन (30, रा. बेत्तूल जजील मज्जीदचे गल्लीत, पवारवाडी ) यांच्याबरोबर बहिणीच्या घरी गेले होते. मात्र, इम—ानने धारदार चाकूने मोबीन यांच्या चेहर्‍यावर वार केला.

हेही वाचा :

Back to top button