नाशिक : निवडणूक रणनीतीसाठी भाजपची आज मुंबईत खलबते

नाशिक : निवडणूक रणनीतीसाठी भाजपची आज मुंबईत खलबते
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा : आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेतील नाराज आणि प्रभागांच्या शोधामध्ये असलेल्या नगरसेवकांसह बड्या इच्छुकांना गळाला लावण्यासाठी भाजप पदाधिकार्‍यांना आज (दि.10) मुंबईत बोलविण्यात आले आहे. याच बैठकीत आगामी निवडणुकीची रणनीतीदेखील ठरविली जाणार आहे.

नाशिकमधील भाजपचे आमदार, महापौर, स्थायी समिती सभापतींसह प्रमुख नेत्यांना या बैठकीसाठी आमंत्रित करण्यात आले आहे. आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने दत्तक नाशिकची केलेली शब्दपूर्ती याबाबतही भाजपकडून जोरदार प्रयत्न केले जात आहेत. बैठकीला आमदार देवयानी फरांदे, सीमा हिरे, अ‍ॅड. राहुल ढिकले, महापौर सतीश कुलकर्णी, स्थायी समिती सभापती गणेश गिते, शहराध्यक्ष गिरीश पालवे तसेच माजी आमदार व संघटनेतील ज्येष्ठ पदाधिकार्‍यांना बोलविण्यात आले आहे. भाजपने शहरात केलेली विकासकामे, प्रकल्प तसेच योजना याविषयीचा आढावा पक्षश्रेष्ठींकडून घेतला जाणार आहे. तसेच नजीकच्या काळात कोणत्या प्रकल्पांचे भूमिपूजन करायचे याबाबतही माहिती घेऊन नियोजन करण्यात येणार आहे. राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आल्यानंतर नाशिक महापालिकेत शिवसेनेचा विविध बाबतीत हस्तक्षेप वाढला आहे. तसेच मनपातील शिवसेना पदाधिकार्‍यांकडूनही वारंवार राज्य शासनाची धमकी दिली जात असल्याने त्याचे उट्टे काढण्याचा चंग भाजपने बांधला आहे.

शिवसेनेने वसंत गिते व सुनील बागूल यांची घरवापसी करून घेतल्यानंतर भाजपमधील आणखी काही नगरसेवक शिवसेनेचे शिवबंधन हाती बांधून घेणार असल्याचे शिवसेनेकडून सांगण्यात येत आहे. आता निवडणुका जवळ आल्याने भाजपही शिवसेनेतील इच्छुक तसेच नगरसेवकांचे फोडाफोडीचे राजकारण खेळणार आहे. यामुळे दोन्ही पक्षांतील राजकीय वादही विकोपाला जाण्याची शक्यता आहे.

शिवसेनेला बंडखोरीची डोकेदुखी
निवडणुकीसाठी राष्ट्रवादी आणि शिवसेना आघाडीची चर्चा रंगू लागली आहे. आघाडी झालीच तर त्याचा सर्वाधिक फटका शिवसेनेला बसणार आहे. कारण शिवसेनेत इच्छुकांबरोबरच विद्यमान नगरसेवकांची संख्या मोठी आहे.यामुळे आघाडी झाली तर पदरात जागा कमी पडल्यास उमेदवारी कुणाकुणाला द्यायचा असा प्रश्न शिवसेनेसमोर ठाकणार असून, मोठ्या बंडखोरीला सामोरे जावे लागू शकते. यामुळे आघाडीबाबत अनेकांची नाखूशीच आहे. त्यातही निर्णय झालाच तर अनेकजण भाजपच्या जहाजात उड्या घेतल्याशिवाय राहणार नाही. याशिवाय शिवसेनेतील काही पदाधिकारी स्वत:च्याच उमेदवारांना संकटात टाकण्याच्या भीतीने अनेकांनी भाजपशी संपर्क साधल्याचे बोलले जात आहे.

हेही वाचा :

दैनिक पुढारीचे नाशिक आणि उत्तर महाराष्ट्रासाठीचे हे फेसबुक पेज… नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील विविध बातम्या, लेख, व्हिडिओ असे सगळं काही या पेजवर असेल. नाशिकच्या द्राक्ष्यांचा गोडवा आणि मिसळचा झणझणीतपणा एकाच वेळी देण्याचा प्रयत्न आमची टीम करत आहे. त्यामुळे नक्की लाईक करा आणि फॉलो करा.. मंडळ आभारी आहे.. ? पेज लाईक करण्यासाठी येथे क्लिक करा.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news