धुळे : संरक्षण खात्याचे बनावट बिल बनवून केली जात होती मद्याची तस्करी ; दोघांना बेड्या

धुळे : संरक्षण खात्याचे बनावट बिल बनवून केली जात होती मद्याची तस्करी ; दोघांना बेड्या
Published on
Updated on

धुळे पुढारी वृत्तसेवा : संरक्षण खात्याचे बनावट दस्तऐवज तयार करून हरियाणा बनावटीची एक कोटी 40 लाख रुपये किमतीच्या मद्याची तस्करी करणाऱ्या दोघांना स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक शिवाजी बुधवंत यांच्या पथकाने बेड्या ठोकल्या आहे. नाशिक येथील मिलिटरी कॅम्पच्या कॅन्टीन मध्ये हा मद्य साठा जात असल्याचे कागदपत्र मद्य तस्करीसाठी वापरण्यात आल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

मुंबई-आग्रा महामार्गावर मोहाडी उपनगर परिसरातील टोलनाक्यावर असलेल्या कलकत्ता पंजाब ढाब्याच्या पाठीमागे मोकळ्या पटांगणात कंटेनर क्रमांक आरजे 14 जीएफ 94 46 हा संशयित रित्या उभा असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक शिवाजी बुधवंत यांना मिळाली. त्यानुसार बुधवंत यांनी ही माहिती अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव यांच्या निदर्शनास आणून दिली. यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश पाटील, पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब सूर्यवंशी व योगेश राऊत यांच्यासह श्रीकांत पाटील, प्रभाकर बैसाने ,संजय पाटील, प्रकाश सोनार, संदीप सरग, संतोष हिरे, राहुल गिरी, कमलेश सूर्यवंशी, योगेश चव्हाण, मयुर पाटील आदींनी या ढाब्याच्या परिसरात सापळा लावला. या पथकाने राजस्थान राज्यात राहणारे दीपक धरमवीर सिंग आणि उत्तर प्रदेश राज्यात राहणारे मोहम्मद दानिश मोहम्मद गौस या दोघांना ताब्यात घेतले.

या दोघांची चौकशी केली असता या दोघांनी कंटेनरमध्ये नाशिक येथील मिलिटरी कॅम्प कॅन्टीन मधील मद्याचा साठा व अन्य मालाचा साठा असल्याचे सांगितले. हा मद्याचा साठा जयपूर राजस्थान येथील मिलिटरी कॅम्प येथून भरल्याचे सांगून संरक्षण खात्याचे बनावट दस्तऐवज व बिल सादर केले. मात्र या दोघांचे वर्तन संशयास्पद वाटत असल्याने पोलीस पथकाने कंटेनर ताब्यात घेऊन पोलिस अधीक्षक कार्यालयात आणला असता हा सर्व बनावट प्रकार असल्याचे निदर्शनास आले. हरियाणा येथे तयार केलेला व याच राज्यात विक्रीसाठी परवानगी असलेला दारुचा साठा या कंटेनरमध्ये आढळून आला. कंटेनरमधून मॅकडॉल व्हिस्की चे 775 बॉक्स तसेच रॉयल चॅलेंज व्हिस्कीचे 175 बॉक्स आणि ऑल सीजन व्हिस्कीचे 50 बॉक्स आढळून आले. या मद्याची किंमत एक कोटी वीस लाख रुपये असून कंटेनरची किंमत वीस लाख रुपये आहे. पोलिसांनी हा सर्व साठा जप्त केला असून दोघाही आरोपींना ताब्यात घेतले आहे. दरम्यान संरक्षण खात्याच्या नावाने मद्याच्या तस्करीचा हा प्रकार उघड झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

दैनिक पुढारीचे नाशिक आणि उत्तर महाराष्ट्रासाठीचे हे फेसबुक पेज… नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील विविध बातम्या, लेख, व्हिडिओ असे सगळं काही या पेजवर असेल. नाशिकच्या द्राक्ष्यांचा गोडवा आणि मिसळचा झणझणीतपणा एकाच वेळी देण्याचा प्रयत्न आमची टीम करत आहे. त्यामुळे नक्की लाईक करा आणि फॉलो करा.. मंडळ आभारी आहे.. ? पेज लाईक करण्यासाठी येथे क्लिक करा.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news