महाड; श्रीकृष्ण द बाळ : महाड पोलादपूर परिसरात तुफान पर्जन्यवृष्टी सुरू आहे. गेल्या ४८ तासांपासून महाड पोलादपूर तालुक्यातील जोरदार पाऊस आहे. तालुक्यातील सावित्री नदी दुथडी भरून वाहत आहे.
अधिक वाचा –
सिंचन विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, सकाळी नऊ वाजता सावित्री नदीचे पात्र धोक्याच्या पातळीपेक्षा कमी असल्याचे सांगण्यात आले. मात्र, गेल्या ४८ तासांतील पावसाच्या अनुभवातून स्थानिक प्रशासन नगरपालिका यंत्रणा सतर्क झाल्याची माहिती देण्यात आली आहे .
अधिक वाचा –
महाड शहरामध्ये दस्तुरी नाका गांधारी नाका व भोईघाट या तीन ठिकाणांहून पाणी येते. काकरतळे येथील लेंड वहाळ येथून नदीचे पाणी व त्यानंतर इतर ठिकाणी पाणी शिरते.
अधिक वाचा –
सकाळी नऊ वाजता या सर्व ठिकाणी प्रत्यक्ष भेटी दिली. त्यावेळी लगतच्या शेती व सखल भागात पाणी साचण्यास सुरूवात झाली.
सिंचन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सावित्री नदीची पातळी ६.५० मीटर उंचीवर धोकादायक स्थितीत दर्शवण्यात येते. ती सकाळी नऊ वाजता ५.७० एवढी असल्याचे सांगण्यात आले आहे.
आठवड्याच्या शेवटी जनजीवन विस्कळीत झाल्याचे दिसून आले. आज सकाळपासून देखील विक्रम रिक्षा फार अभावानेच ग्रामीण भागातून महाड शहरामध्ये येत असल्याचे पाहावयास मिळाले.
दरम्यान, स्थानिक प्रशासनाकडून आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी तयारी सुरू आहे. सर्व यंत्रणा सतर्क असल्याची माहिती नगरपालिका प्रशासन अधिकारी जीवन पाटील यांनी दिली आहे. महाड पोलादपूरमधील स्थानिक प्रशासन यंत्रणा सज्ज आहे. अशी माहिती प्रांताधिकारी श्रीमती प्रतिमा पुदलवाड उपविभागीय पोलिस अधिकारी नीलेश तांबे यांच्याकडून मिळाली आहे.
अधिक वाचा –
पाहा व्हिडिओ – ज्वालामुखीतून निर्माण झाली घोराडेश्वर डोंगरावरील गुहा…