विहार तलाव भरुन वाहू लागला, पाणलोट क्षेत्रात मुसळधार

मुंबई येथील विहार तलाव आज सकाळी भरला.
मुंबई येथील विहार तलाव आज सकाळी भरला.
Published on
Updated on

मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : विहार तलाव आज सकाळी भरुन‌‌ वाहू लागला आहे‌. बृहन्मुंबई महापालिका क्षेत्राला पाणीपुरवठा करणा-या दोन तलावांपैकी एक असणारा विहार तलाव गेल्यावर्षी ०५ ऑगस्‍ट २०२० रोजी पूर्ण भरला होता.

अधिक वाचा 

१८५९ मध्ये ६५ लाख रुपये खर्चून या तलावाची बांधणी झाली होती. २७,६९८ दशलक्ष लीटर उपयुक्‍त जलधारण क्षमता असणारा हा तलाव वर्ष २०१९ मध्ये ३१ जुलै रोजी ओसंडून वाहू लागला होता. तर २०१८ मध्‍ये दिनांक १६ जुलै रोजी तलाव भरला होता.

अधिक वाचा 

या तलावातून दररोज सरासरी ९० दशलक्ष लीटर (९ कोटी लीटर) एवढ्या पाण्‍याचा पुरवठा केला जातो. गेल्या काही दिवसांत या तलावाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसामुळे हा तलाव भरून वाहू लागला आहे, अशी माहिती महापालिकेच्या जल अभियंता खात्याने दिली आहे.

बृहन्‍मुंबई महापालिकेला पाणीपुरवठा करणा-या लहान २ तलावांपैकी दुसरा तुळशी आहे.

मुंबईत तीन दुर्घटनांमध्‍ये २१ जणांचा मृत्‍यू

मुंबईत मध्यरात्रीपासून पहाटेपर्यंत कोसळलेल्या मुसळधार पावसाने चेंबूर, विक्रोळी व भांडुप येथे घडलेल्या दुर्घटनांमध्ये तब्बल २१ लोकांना जीव गमवावा लागला आहे. एनडीआरएफ आणि विविध यंत्रणांकडून दोन्ही दुर्घटनास्थळी बचाव कार्य सुरू असल्याची माहिती मुंबई मनपाने दिली आहे.

मुंबई महानगरपालिकेकडून मिळालेल्या माहितीनुसार, चेंबूरच्या वाशी नाका येथे असलेल्या भारत नगरमध्ये बीएआरसीची संरक्षक भिंत पाच घरांवर कोसळली.

भिंत कोसळल्याने झोपी गेलेल्या तब्बल १४ नागरिकांवर काळाने घाला घातला आहे.दुर्घटनेत अद्यापपर्यंत १४ जणांचा मृत्यू झाला असून २ जणांंना उपचार करून डिस्चार्ज दिल्याचे राजावाडी रुग्णालयाच्या डॉ. विद्या ठाकूर यांनी सांगितले.

मुंबई उपनगरातील भांडुप येथे वन विभागाची भिंत कोसळल्याने एका १६ वर्षीय युवतीला जीव गमवावा लागला आहे.

विक्रोळी येथील सूर्यनगरमध्ये पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास मुसळधारेने सहा घरांवर दरड कोसळल्याने एका कुटुंबातील तीन जणांचा मृत्यू झाला आहे.

हेही वाचलं का?

पाहा व्‍हिडीओ : ज्वालामुखीतून निर्माण झाली घोराडेश्वर डोंगरावरील गुहा…

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news