नवी मुंबई शहरात मुसळधार; १२ तासांत २०० मिमी पावसाची नोंद | पुढारी

नवी मुंबई शहरात मुसळधार; १२ तासांत २०० मिमी पावसाची नोंद

नवी मुंबई; पुढारी वृतसेवा : नवी मुंबई शहरात शनिवारी रात्रीपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे एका ठिकाणी भिंत कोसळली. तर नऊ ठिकाणी सखल भागात पाणी साचले. नवी मुंबई शहरात सरासरी दोनशे मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

अधिक वाचा :

नवी मुंबईत शनिवारी रात्री नऊ वाजल्यापासून मुसळधार पावसाला सुरूवात झाली. पहाटे सहा वाजेपर्यंत पाऊस सुरू होता. शहरात एका ठिकाणी भिंत कोसळली. यामध्ये कुणीही जखमी झाले नसल्याची माहिती प्रशासनाने दिली.

तर एक गॅस गळती आणि पाच ठिकाणी झाडे कोसळली. तर नऊ जागी ठिकाणी सखल भागात पाणी साचले. एक शॉर्टसर्किटची घटना घडली.

अधिक वाचा :

शहरात 198.88 मिमी पावसाची 12 तासांत नोंद झाली आहे. एकूण 1451.44 मिमी पावसाची नोंद झाली.

मोरबे धरण क्षेत्रात 167.80 मिमी तर एकूण 1481.90 मिमी पावसाची नोंद झाली. मोरबे धरणाची पातळी 76.84 मीटरपर्यंत पोहोचली आहे.

शहरात सर्वाधिक पाऊस कोपरखैरणे विभागात 211.50 मिमी, बेलापूर विभागात 201.20, नेरूळ 197.20, वाशी 193.90 तर ऐरोलीत 190.60 मिमी पावसाची नोंद झाली आहे.

अधिक वाचा :

अनेक ठिकाणी वाहने बंद पडली होती. पामबीच मार्गावर सिंग्नल यंत्रणा बंद पडली होती. नेरूळ, उरणफाटा उड्डाणपूलावर खड्डे पडल्याने वाहनचालकांना कसरत करावी लागली.

सायन पनवेल महामार्गावर तुर्भे शिरवणे, सानपाडा दरम्यान काही वेळ वाहतूक कोंडी झाली होती.

हे ही वाचा :

 

Back to top button