Stock Market | शेअर गुंतवणूकदारांचे सात लाख कोटी बुडाले | पुढारी

Stock Market | शेअर गुंतवणूकदारांचे सात लाख कोटी बुडाले

मुंबई, पुढारी वृत्तसेवा : बँकिंग आणि पायाभूत सुविधांमधील बलाढ्य कंपन्यांच्या शेअर विक्रीचा सपाटा लावल्याने भारतीय शेअर निर्देशांक भुईसपाट झाला. सेन्सेक्स तब्बल 1 हजार 62 आणि निफ्टी 345 अंकांनी कोसळला. गुरुवारच्या सत्रात गुंतवणूकदारांचा खिसा 7 लाख 30 हजार कोटी रुपयांनी रिकामा झाला.

मुंबई शेअर बाजारातील (बीएसई) गुंतवणूकदारांची निराशा चौथ्या सत्रात आणखी वाढली. रिलायन्स इंडस्ट्री, लार्सन अँड टुब्रो (एल अँड टी) यासारख्या बलाढ्य कंपन्यांसह बँकिंग क्षेत्रातील बड्या कंपन्यांच्या शेअर विक्रीचा सपाटा लावल्याने सेन्सेक्स कोसळला. गुरुवारच्या सत्रात सेन्सेक्स नीचांकी 1,130 अंकांवर खाली घसरला होता. बाजार बंद होताना त्यात काहीशी सुधारणा झाली. अखेरीस सेन्सेक्स 1.45 टक्क्याच्या घटीसह 72,404 अंकांवर स्थिरावला.

विक्रीच्या सपाट्याने बाजार भेलकांडला

मुंबई : मतदानाचा घसरलेला टक्का आणि विदेशी गुंतवणूकदारांनी सुरू केलेला विक्रीचा सपाटा यामुळे गुरुवारी शेअर निर्देशांक आपटला. या वावटळीत 2 हजार 629 कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी घट झाल्यानेे गुंतवणूकदारांना 7 लाख 30 हजार कोटी रुपयांचा फटका बसला. बाजार बंद होताना काहीशी सुधारणा झाली.

सोमवारच्या (दि.6) सत्रात बीएसईतील 2,629 कंपन्यांच्या शेअरमध्ये घट झाली होती. त्यामुळे गुंतवणूकदारांना 2.83 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले. मंगळवारी (दि.7) सेन्सेक्स 384 अंकांनी कोसळल्याने गुंतवणूकदारांना 5 लाख कोटी रुपयांचा फटका बसला होता.
मुंबई शेअर बाजारातील (बीएसई) गुंतवणूकदारांची निराशा चौथ्या सत्रात आणखी वाढली. रिलायन्स इंडस्ट्री, लार्सन अँड टुर्बो (एल अँड टी) यासारख्या बलाढ्य कंपन्यांसह बँकिंग क्षेत्रातील बड्या कंपन्यांच्या शेअर विक्रीचा सपाटा लावल्याने सेन्सेक्स कोसळला. सेन्सेक्स हजार अंकांहून अधिक कोसळल्याने गुंतवणूकदारांनी 7 लाख 30 हजार कोटी गमावले. त्यामुळे बीएसईतील नोंदीत कंपन्यांचे मूल्य घटून 393.73 लाख कोटी रुपयांवर आले.

गुरुवारच्या सत्रात सेन्सेक्स नीचांकी 1,130 अंकांवर खाली घसरला होता. बाजार बंद होताना त्यात काहीशी सुधारणा झाली. अखेरीस सेन्सेक्स 1.45 टक्क्याच्या घटीसह 72,404 अंकांवर स्थिरावला. राष्ट्रीय शेअर बाजारातही (एनएसई) निफ्टी नीचांकी 370 अंकांवर खाली गेला होता. बाजार बंद होताना त्यात काहीशी सुधारणा झाली. अखेरीस निफ्टी निर्देशांक 1.55 टक्क्याने घटून 21,957 अंकांवर बंद झाला. एल अँड टी आणि एचडीएफसी बँकेच्या शेअरने शेअर बाजार कोसळविण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. एल अँड टीचा महसूल घटल्याने शेअर 6 टक्क्यांनी कोसळून 3,289.95 रुपयांवर खाली आला. रिलायन्स आणि आयटीसीच्या शेअरची मोठ्या प्रमाणावर विक्री झाल्याने शेअर बाजार कोसळण्याला आणखी हातभार लागला.

म्हणून कोसळला बाजार

लोकसभा निवडणुकीतील घसरलेल्या मतदानाच्या टक्क्यामुळे अनिश्चितता निर्माण झाली आहे. त्यामुळे सत्ताधार्‍यांचा निवडणुकीचा मार्ग आणखी खडतर झाल्याचे सूतोवाच मिळाल्याचे पडसाद बाजारात उमटले. विविध कारणांमुळे बलाढ्य कंपन्यांचे शेअर विक्रीला आले. निफ्टी बँक निर्देशांक 533 अंकांनी घटून 47,487 अंकांवर आला. एफएमसीजी निर्देशांक 1,400 अंकांनी कोसळून 54,625 अंकांवर स्थिरावला.

विदेशी संस्थांनी काढले पैसे

फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टर्सने (एफपीआय) गेल्या चार दिवसांत शेअर विक्रीचा मारा केला. बुधवारी (दि. 8) 2,854 आणि त्यापूर्वीच्या सप्ताहात मिळून 5 हजार 76 कोटी रुपयांची शेअर विक्री केली.

Back to top button