Lok Sabha Election 2024 : वंचितचे मावळ, शिरूरचे उमेदवार जाहीर | पुढारी

Lok Sabha Election 2024 : वंचितचे मावळ, शिरूरचे उमेदवार जाहीर

मुंबई : पुढारी वृत्तसेवा : वंचित बहुजन आघाडीने शनिवारी मावळ व शिरूर लोकसभा मतदारसंघातील आपल्या उमेदवारांची नावे जाहिर केली. त्यानुसार मावळमधून माधवी जोशी तर अन्वर मखबुल शेख यांना शिरूर येथून निवडणूकीच्या रिंगणात उतरवण्यात आले आहे. वंचितने ही यादी ’एक्स’ या समाजमाध्यमावरून जारी केली.

माधवी जोशी यांनी वंचित बहुजन आघडीचे राज्य उपाध्यक्ष तथा मुख्य प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे यांच्या उपस्थितीत आजच वंचितमध्ये प्रवेश केला. पक्षात प्रवेश करताच जोशी यांना लगेचच उमेदवारी देण्यात आली. शिरुरमधून आफताब शेख यांना उमेदवारी देऊन वंचितने निवडणूकीत रंगत आणली आहे. त्यामुळे आता या दोन्ही मतदारसंघात तिरंगी लढत अटळ आहे.

Back to top button