MPSC Exam Postpone : एमपीएससीच्या एप्रिल, मे मधील परीक्षा पुढे ढकलल्या | पुढारी

MPSC Exam Postpone : एमपीएससीच्या एप्रिल, मे मधील परीक्षा पुढे ढकलल्या

पुढारी ऑनलाईन डेस्क :  राज्य लोकसेवा आयोगाकडून महाराष्ट्र राजपत्रित संयुक्त पूर्व परिक्षा (MPSC Exam) पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. लोकसभा निवडणूकीच्या पार्शवभीमीवर हा निर्णय घेण्यात आल्याची चर्चा आहे. आयोगाकडून याबाबतची माहिती देण्यात आली आहे. (MPSC exam Scheduled On April 28 postpone)

युपीएससीने परीक्षा पुढे ढकलल्याच्या दिलेल्या निर्णयानंतर परीक्षार्थींसमोर राज्यातील देखील परीक्षा पुढे जातील का प्रश्न समोर झाला. एक्स पोस्टवर दिलेल्या माहितीनुसार, आयोगातर्फे आयोजित दिनांक २८ एप्रिल रोजी होणारी महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा आणि दि. १९ मे रोजी होणारी समाज कल्याण अधिकारी, गट-ब आणि इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी, गट-ब या सरळसेवा चाळणी परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत.या परीक्षांच्या सुधारित तारखा लवकरच जाहीर करण्यात येतील अशी माहिती आयोगाने दिली आहे. तसेच सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गाकरीता अधिनियम, २०२४ मधील आरक्षणाच्या तरतूदी विचारात घेऊन शासनाकडून सुधारित आरक्षण निश्चिती प्राप्त झाल्यानंतर या परीक्षांच्या बाबतीतील पुढील घोषणा आयोगातर्फे करण्यात येईल असे सांगण्यात आले आहे.

Back to top button