रोहित पवारांना ED चा सर्वात मोठा झटका; ‘बारामती अ‍ॅग्रो’ प्रकरणातील कन्नड कारखाना जप्त | पुढारी

रोहित पवारांना ED चा सर्वात मोठा झटका; 'बारामती अ‍ॅग्रो' प्रकरणातील कन्नड कारखाना जप्त

पुढारी ऑनलाईन डेस्क :  शिखर बँक घोटाळ्याप्रकरणी शरद पवार गटाचे नेते रोहित पवार यांना ईडीकडून मोठा धक्का बसला आहे. त्यांच्या बारामती Agro या कंपनीने खरेदी केलेल्या कन्नड सहकारी साखर कारखान्याची मालमत्ता आज ईडीने जप्त केल्याची माहिती दिली आहे. या कारवाईनंतर आता पवारांच्या अडचणीत वाढ झाल्याचे दिसून येत आहे.

कारखान्याची १६१ एकर जमीन ईडीने जप्त केल्याची माहिती एक्सवर पोस्ट करुन दिली आहे. ५०.२० कोटी रुपयांच्या या मालमत्तेवर ईडीने कारवाई करत जप्त केली आहे. शिखर बँक घोटाळ्याप्रकरणी रोहित पवार यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. यापूर्वी त्यांची ईडीकडून दोन ते तीनवेळा चौकशी झालेली आहे. आता छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील कन्नड सहकारी साखर कारखाना ईडीने जप्त केला आहे.

हेही वाचा

Back to top button