कोरोना मृतांच्या कुटुंबीयांना मिळणार आर्थिक अनुदान; असा करा अर्ज

पुढारी ऑनलाईन डेस्क
कोरोना मृतांच्या कुटुंबीयांना आर्थिक अनुदान मिळणार असून तसा राज्य सरकारने निर्णय घेतला आहे. गेल्या दोन वर्षांत कोरोनाच्या दोन लाटांनी हाहाकार माजवला. या लाटांमुळे अनेकांनी आपले जवळचे नातेवाईक, आप्तेष्ट गमावले. अनेकांची कुटुंबं उघड्यावर पडली. या कुटुंबांना आधार देण्यासाठी राज्य सरकारने ५० हजार रुपये सानुग्रह अनुदानाची घोषणा केली आहे.
गेल्या दोन वर्षांत कोरोनाच्या दोन लाटा आल्या. या दोन लाटांमुळे देशभरात हाहाकार माजला होता. अनेकांना उपचार मिळाले नाहीत, तर काहींच्या नातेवाईकांना मृत्यूनंतर स्मशानात अंत्यसंस्कारासाठी जागाही मिळाली नाही. त्यामुळे देशात प्रचंड गोंधळ उडाला होता. महाराष्ट्रात सध्या कोरोनाची लाट संपत आली असली तर दोन लाटांनी राज्यात मोठी मनुष्यहानी झाली आहे.
कोरोना मृतांच्या नातेवाईकांना अनुदान : मदत कोणाला मिळणार?
लक्षणे असलेल्या रुग्णांची आरटीपीसीर किंवा आरएटी चाचणी पॉझिटिव्ह असल्यास तो रुग्ण रुग्णालयात दाखल झालेला असला पाहिजे. त्या व्यक्तीचे नाव क्लिनिकल डायग्नोसिसमध्ये कोविड -१९ रुग्ण असे असले पाहिजे. त्या व्यक्तीचा उपचाररम्यान मृत्यू झाल्यास कोविड १९ मृत्यू असे समजण्यात येईल.
संबधित व्यक्ती कोविड १९ व्यक्तीचा मृत्यू चाचणीच्या दिनांकापासून किंवा रुग्णालयात क्लिनिकल डायग्नासिसच्या दिनांकापासून ३० दिवसांच्या आत झाल्यास त्याला कोविड १९ चा रुग्ण समजण्यात येईल. संबधित व्यक्तीचा मृत्यू जरी रुग्णालयाबाहेर झाला तरी तो कोरोनामुळे मृत्यूमुखी पडला असे ग्राह्य धरून त्या व्यक्तीचे नातेवाईक अनुदानासाठी पात्र ठरतील.
या योजनेसाठी पात्र ठरण्यास संबधित कोरोनाबाधित व्यक्तीचे निदान होऊन रुग्णालयात दाखल झाल्यानंतर ३० दिवसांनंतर मृत्यू झाल्यास तो कोरोनामृत्यू समजण्यात येईल, असे सरकारने आपल्या नियमावलीत म्हटले आहे. संबधित व्यक्तीचे नातेवाईक हेही अनुदानासाठी पात्र ठरतील.
अशी मिळवा मदत
कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या जवळच्या नातेवाईकाने सरकारच्या वेब पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करावा. हा अर्ज स्वत: करू शकतात. तसेच सेतू केंद्रात तसेच ग्रायमपंचायतीच्य एससीएस- एसपीव्ही मधू अर्ज करू शकतात. हा अर्ज करताना अर्जदाराची स्वत:ची माहिती,आधार क्रमांक, बँकेचा तपशील, मृत व्यक्तीची संपूर्ण माहिती, मृत व्यक्तीचा मृत्यू दाखला. अर्ज करणारी व्यक्तीच्या निकट नातेवाईकांचे नाहरकत असल्याचे स्वयं घोषणापत्र जोडावे.
हेही वाचा :