नाना पटोले यांनी बाहेर वाच्यता करण्याची गरज नव्हती; शिवसेनेनं सुनावलं | पुढारी

नाना पटोले यांनी बाहेर वाच्यता करण्याची गरज नव्हती; शिवसेनेनं सुनावलं

मुंबई; पुढारी ऑनलाईन : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार पाळत ठेवत असल्याचा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला. नाना पटोले यांच्या या वक्तव्यानंतर महाविकास आघाडीमध्ये सर्वकाही आलबेल नाही का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. पटोले यांनी केलेल्या विधानाचे राजकारणात तीव्र पडसाद उमटत आहेत.

अधिक वाचा :

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याबाबत थेट मुख्यमंत्री ठाकरे यांच्याकडे संताप व्यक्त केला आहे. अशा आरोपांनी आघाडीला सुरुंग लागत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. आता या राजकीय वादाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने नाना पटोले यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला आहे.

शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी पटोले यांच्या जाहीर वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना पटोले यांनी सामंजस्याची भूमिका घ्यायला हवी, असा सूर व्यक्त केला आहे.

अधिक वाचा :

”पटोले जाहीरपणे भाष्य करत आहे. ते आता महाराष्ट्राच्या काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आहेत. त्यांना मुभा आहे. सरकारमध्ये बाळासाहेब थोरात त्यांचे ज्येष्ठ नेते आहेत. सरकारमध्ये शिवसेनेकडून स्वतः पक्ष प्रमुख आहेत. दुसऱ्या बाजुला अजित पवार आणि मार्गदर्शक शरद पवार आहे. एवढं सगळं असताना त्यांनी एकत्र बसून सामंजस्याने निर्णय घ्यायला हवा. बाहेर वाच्यता करण्याची गरज नाही.” असे अरविंद सावंत यांनी म्हटले आहे.

अधिक वाचा : 

दरम्यान, पटोले यांनी आपल्या वक्तव्यावरून यू-टर्न घेतला आहे. पटोले यांची पक्षाकडून कानउघाडणी झाल्यावर त्यांनी आपली भूमिका बदलली, अशी राजकीय वुर्तळात चर्चा आहे.

माझ्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला. अफवांवर आधारीत कहाण्या रचून आघाडी सरकारमध्ये फूट पडण्याचा विरोधकांचा हा डाव सुरु आहे. काँग्रेस हा पक्ष दिवसेंदिवस लोकाभिमुख होत असल्याने भाजपच्या पायाखालची वाळू सरकायला लागली आहे. अशी भूमिका पटोले यांनी आता घेतली आहे.

हे ही वाचा :

पहा व्हिडिओ : संजय राऊत यांनी घेतलेली शरद पवार यांची मुलाखत- भाग 1

Back to top button