राजकारण आणि मैत्री या नाण्याच्या दोन बाजू आहेत. राजकारण बाजूला ठेवून राजकीय नेते आपल्या वैयक्तीत नातेसंबंधासाठी
भेटीगाठी घेत असतात. मनसे प्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांची भेट झाली. (Raut Meets Thackeray) संजय राऊत हे सपत्नीक राज यांच्या नव्या घरी 'शिवतीर्थ'ला भेटीसाठी गेले होते.
ही भेट राजकीय कारणांसाठी नसल्याचे स्पष्ट झाले आहे. संजय राऊत आपल्या मुलीच्या लग्नाचे आमंत्रण देण्यसाठी गेले होते. दरम्यान राज आणि संजय राऊत यांच्यात बऱ्याच वर्षातून भेट झाली आहे. संजय राऊत हे सपत्नीक राज यांच्या नव्या घरी 'शिवतीर्थ'ला भेटीसाठी गेले होते. सुमारे अर्धा तास त्यांच्यात ही भेट झाली.
राज ठाकरे आणि त्यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांना मुलीच्या लग्नाची पत्रिका देण्यासाठी राऊत राज यांच्या घरी गेले होते. या खासगी भेटीनंतर राऊत राज यांच्या घराबाहेर पडले तेव्हा राज आणि शर्मिला ठाकरे हे त्यांना अगदी गाडीपर्यंत सोडण्यासाठी आले होते.
संजय राऊत अनेकदा राज्यपाल विरोधी भाजपवर जोरदार टीका करताना दिसत असतात; परंतु राज्यपाल कोश्यारींना संजय राऊत यांनी राजभवन येथे जाऊन राज्यपालांना आग्रहाचे निमंत्रण दिले आहे. राऊत यांची कन्या पूर्वशीच्या लग्नाची जय्यत तयारी सध्या सुरु आहे.
ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांचे चिरंजीव मल्हार यांच्याशी पूर्वशीचा विवाह होणार आहे. २९ नोव्हेंबरला मुंबईतील रेनेसाँ या सप्ततारांकित हॉटेलमध्ये हा विवाह सोहळा पार पडणार आहे.