Avadhoot Gupte : विक्रम गोखले आम्हाला वडिलांच्या स्थानी, ते विचार करूनच बोलले असतील | पुढारी

Avadhoot Gupte : विक्रम गोखले आम्हाला वडिलांच्या स्थानी, ते विचार करूनच बोलले असतील

मुंबई : पुढारी ऑनलाईन

बॉलिवूड अभीनेत्री कंगना राणावत हीला पद्मश्री पुरस्कार देण्यात आला. याप्रसंगी कंगणाने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर करून चाहत्यांचे आभार मानले. यावेळी तीने वादग्रस्त वक्तव्य करून देशात नव्या वादाला तोंड फोडले. आपल्या देशाल जे स्वातंत्र्य मिळाले ती भीक होती, देशाला खरे स्वातंत्र्य २०१४ मध्येच मिळाले, असे वादग्रस्त विधान केले. (Avadhoot Gupte)

कंगणाच्या या वक्तव्याचे समर्थन ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले (Vikram Gokhale) यांनी पुण्यातील एका कार्यक्रमानंतर केले. यावरून राज्यातील मराठी कलाकारांनी आपली मते व्यक्त केली. अतूल कुलकर्णीने विक्रम गोखले यांचे नाव न घेता टोमणा मारला होता.

दरम्यान यावर प्रसिद्ध संगीतकार, गायक अवधूत गुप्ते (Avadhoot Gupte)ने, विक्रम गोखले आम्हाला वडिलांच्या स्थानी आहेत. ते विचार करूनच बोलले असतील, अशी प्रतिक्रिया दिली आहे.

Avadhoot Gupte : ते आम्हाला वडिलांच्या स्थानी

यावेळी गुप्ते पुढे म्हणाले, कंगणा रानावत आणि राजकीय विषयावर मला काही बोलायचे नाही पण विक्रम गोखले आम्हाला वडिलांसारखे आहेत त्यांनी केलेले वक्तव्य विचारकरूनच बोलले असतील. ते मोठे कलाकार आहेत. ते एक मोठे कलाकार आणि विचारवंत आहेत त्यांचा अभ्यास खूप मोठा आहे ते आम्हाला वडिलांच्या स्थानी आहेत.

आम्ही त्यांचा खूप आदर करतो. ते जे काही बोलले असतील, ते विचार करूनच बोलले असतील. त्यांनी व्यक्त केलेले मत पूर्ण विचारांती असावे. त्यावर प्रतिक्रिया देण्याइतकी माझी पात्रता नाही, असे अवधूत गुप्ते याने सांगितले.

तसेच कंगनाच्या वादग्रस्त विधानावर बोलणे टाळले.

विक्रम गोखले काय म्हणाले ?

७५ व्या वाढदिवसानिमित्त ब्राह्मण महासंघाच्या वतीने पत्रकारांशी विक्रम गोखले बोलत होते.

यावेळी त्‍यांनी कंगनाच्या वादग्रस्त वक्तव्याचं समर्थन करत पंतप्रधान नरेंद्र माेदी यांचे कौतुक केलं.

त्याचबरोबर शिवसेना आणि भाजप एकत्र आल्यास बरं होईल, असंही ते म्हणाले.

“कंगना जे म्हणाली ते खरंय, मी समर्थन करतो त्या वक्तव्याचे, कुणाच्याही मदतीने स्वातंत्र्य मिळाले नाही, ते भिकेनेच मिळाले आहे.

आपले स्वातंत्रवीर जेव्हा फाशीवर जात होते तेव्हा फाशीपासून त्यांना कोणी वाचवलं नाही अनेकजण बघत राहिले”, असा गंभीर आरोपही विक्रम गोखले यांनी केला.

“कंगनाच्या वक्तव्याला पाठिंबा दर्शवत देश कधीही हिरवा होणार नाही, हा देश भगवा राहिला पाहिजे. राजकीय वर्तुळात परिस्थिती गंभीर झालेली आहे, कोणाची नावं घेत नाही.

देशाचा इतिहास बाबरापासून सुरु होतो तो आणि छापला जातो हे दुर्दुैव

ब्राह्मण समाजवरती टीकेची झोड उठवणे, मराठा आणि ब्रह्मणांमध्ये मतभेद निर्माण करणे, काय चाललंय हे? कुणबी, क्षत्रिय हे सर्व माझे आहेत.

दलितांना दलित म्हणणे मला पटत नाही. देशाचा इतिहास बाबरापासून सुरु होतो तो आणि छापला जातो हे दुर्दुैव आहे.

बाबरापूर्वी कोणी नव्हते का? या देशाकरिता झटणारा हा माझा मुसलमान आहे, त्यात मी भेदाभेद करत नाही.

माझ्या दृष्टीने बाबासाहेब या देशाला कळले नाहीत, आंबेडकर मोठे व्यक्तिमत्त्व होते.

त्यांची तुलना कोणाशीच होऊ शकत नाही”, असेही विक्रम गोखले म्‍हणाले.

Back to top button