बॉलीवूड अभिनेत्री कंगना रनौत हिने महात्मा गांधी आणि सुभाषचंद्र बोस यांच्यासंदर्भात केलेल्या विधानावर मोठा वाद सुरु झाला आहे. आता यावर सुभाष चंद्र बोस यांची कन्या अनिता बोस ( Anita Bose Pfaff) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी म्हटलं आहे की, नेताजी सुभाष चंद्र बोस यांचे देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात मोठे योगदान होते. मात्र केवळ सुभाष चंद्र बोस यांच्यामुळेच देशाला स्वातंत्र्य मिळाले, असा दावा करणेही चुकीचे होईल. महात्मा गांधी आणि सुभाषचंद्र बोस या दोघांनी सर्वांना स्वातंत्र्य चळवळीत सहभागी होण्यासाठी लाखाे लाेकांना प्रेरित केले होते. या दोघांचाही प्रयत्नांमुळेच देशाला स्वातंत्र्य मिळाले.
'इंडिया टुडे'शी बोलताना अनिता बोस ( Anita Bose Pfaff) म्हणाल्या की, माझे वडील सुभाष चंद्र बोंस यांचे व्यक्तिमत्व खूपच प्रभावी होते. महात्मा गांधींना असे वाटत होते की, ते नेताजींना आपल्या नियंत्रणात ठेवू शकतात. मात्र ते तसे करु शकले नाहीत. सुभाषचंद्र बोस हे महात्मा गांधी यांचे मोठे प्रशंसक होते. आपल्या कार्याबद्दल महात्मा गांधी यांचे मत काय आहे, जाणून घेण्यास त्यांना नेहमी उत्सुकता असे.
नेताजी सुभाष चंद्र बोस आणि महात्मा गांधी हे दोन्ही आमचे नायक आहेत. दोघांनीही देशाच्या स्वातंत्र्य चळवळीत मोठे योगदान दिले. दोघेही एकमेकांना पूरकच होते. त्यावेळी काँग्रेसच्या काही सदस्यांना असे वाटत होते की, देशाला केवळ अहिंसेच्या मार्गानेच स्वातंत्र्य मिळेल. मात्र यावेळी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याआझाद हिंद सेनेचे स्वातंत्र्य चळवळीत मोठे योगदान होते. मात्र केवळ सुभाषचंद्र बोस यांच्यामुळेच देशाला स्वातंत्र्य मिळाले, असा दावा करणे चुकीचे आहे. महात्मा गांधी आणि सुभाषचंद्र बोस या दोघांनी सर्वांना स्वातंत्र्य चळवळीत सहभागी होण्यासाठी प्रेरित केले होते. या दोघांचाही प्रयत्नांमुळेच देशाला स्वातंत्र्य मिळाले, असेही त्यांनी स्पष्ट केले.
वृत्तपत्रात आलेल्या वृताचा हवाला देत कंगना म्हणाली होती की, महात्मा गांधी आणि पंडित जवाहरलाल नेहरु हे नेताजी सुभाष चंद्र बोस यांना इंग्रजांच्या ताब्यात देणार होते. तुम्ही एकतर गांधींचे चाहते आहात किंवा नेताजींचे समर्थक आहात. या दोन्ही गोष्टी तुम्ही एकावेळा करु शकत नाही. एकच गोष्ट निवडा.
कनंगाने दुसर्या पोस्टमध्ये म्हटलं होतं की., ज्यांनी स्वातंत्र्यासाठी लढा दिला त्यांनी बोस यांना इंग्रजांकडे सोपवण्याची तयारी दाखवली होती. एका ब्रिटीश न्यायाधीशाकडे गांधी, जवाहरलाल नेहरू आणि मोहम्मद अली जीना यांनी सुभाषचंद्र बोस भारतात आले तर त्यांना ताब्यात देण्याची तयारी दाखवली होती. अन्यायाविरोधात झूंज देण्याची त्यांची तयार नव्हती. ते धूर्त आणि सत्तेचे लाेभी हाेते. हे तेच लोक होते ज्यांनी आम्हाला शिकवले की, तुम्हाला कोणी कानाखाली मारली तर तुम्ही दुसरा गाल पुढे करा. मात्र अशा प्रकारे कोणाला स्वातंत्र मिळत नाही तर परमार्थ मिळू शकतो. तुमचा नायक हुशारीने निवडा."