जयंत पाटील ८ आमदारांसह आमच्या संपर्कात : धर्मरावबाबा आत्राम यांचा दावा | पुढारी

जयंत पाटील ८ आमदारांसह आमच्या संपर्कात : धर्मरावबाबा आत्राम यांचा दावा

नागपूर; पुढारी वृत्तसेवा :  राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटातील दावेदारी अजूनही संपलेली नाही. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अजित पवार गटातील १५ आमदार आमच्या संपर्कात आहेत. अनेकजण आम्हाला परत यायचे आहे, असे म्हणत आहेत, असा दावा केला आहे. मात्र, अंतिम निर्णय शरद पवार हेच घेतील असे स्पष्ट केले होते. दरम्यान आज जयंत पाटील हेच शिल्लक ८ आमदारांसह आमच्या वरिष्ठांच्या संपर्कात असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते, अन्न व औषधी प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी आज माध्यमांशी बोलताना केला आहे.

संबंधित बातम्या : 

गेले अनेक दिवस आत्राम हा दावा करीत आहेत, हे विशेष. या दाव्याने राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे आहेत. राज्य मंत्रिमंडळ विस्तार खोळंबला आहे, तो लवकरच या शक्यतेसह होणार का, शंभूराज देसाई बोलले त्याप्रमाणे लवकरच राज्यात राजकीय भूकंप होणार का? याविषयीची देखील शक्यता बळावली आहे.

हेही वाचा : 

Back to top button