Maharashtra Politics : काटोल मतदारसंघावरून देशमुख काका-पुतणे आणि बावनकुळे यांच्यात जुंपली! | पुढारी

Maharashtra Politics : काटोल मतदारसंघावरून देशमुख काका-पुतणे आणि बावनकुळे यांच्यात जुंपली!

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : आमची अकरा पक्षांची महायुती आहे. लोकसभेमध्ये ४५ जागा निवडून येणार असा आम्हाला विश्वास आहे. २०२४ ला काटोल मतदारसंघात कोण विजयी झाले, कोणाचा पराभव झाला हे माजी मंत्री अनिल देशमुख यांना दिसूनच येईल, असा इशारा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला आहे.

संबंधित बातम्या : 

आज बावनकुळे यांनी अनिल देशमुख यांना पुन्हा एकदा लक्ष्य केले आहे. तत्पूर्वी अनिल देशमुख यांनी ट्विटरवर बावनकुळे, उपमुख्यमंत्री देवेंन्द्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. २०२४ मध्ये मुख्यमंत्री होण्यासाठी देवेंद्र फडणवीस हेच भाजप कार्यकर्त्यांची पसंती आहेत, त्यादृष्टीने कामाला लागा, असे आवाहन त्यांनी रत्नागिरी येथील कार्यकर्त्यांशी संवाद साधताना केले.

दरम्यान, राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे नेते माजी मंत्री अनिल देशमुख यांनी बावनकुळे पण मुख्यमंत्री होण्यासाठी निवडून यावे लागेल, नागपुरातील तुमच्याच पक्षाचे लोक कधी निवडणूक येतेय याची वाट बघत आहेत, असे म्हटले होते. त्यानंतर देशमुख यांचे पुतणे माजी आमदार डॉ. आशीष देशमुख यांनी अहो काका… तुम्ही आपली चिंता करा… फडणवीस विक्रमी मतांनी निवडून येतील. २०१४ साली मी तुमचा पराभव केला, २०१९ ला मी तिथे लढलो नसल्याने तुमचा निभाव लागला, २०२४ मध्ये तुम्हाला पक्ष तिकीट देणार की तुमच्या मुलाला ? असा सवाल केला. दुसरीकडे देशमुख यांनी फडणवीस यांना दिलेल्या या आव्हानाला बावनकुळे यांनी लगेच प्रत्युत्तर दिले आहे. मोदींच्या काळात नऊ वर्ष अनेक योजना राबविल्या आहेत, त्याचा आम्हालाच फायदा होईल असा दावा केला आहे.

हेही वाचा :

Back to top button