मुकेश अंबानींचा अँटिलिया पत्ता विचारणारे दोन संशयित कोण होते? | पुढारी

मुकेश अंबानींचा अँटिलिया पत्ता विचारणारे दोन संशयित कोण होते?

पुढारी ऑनलाईन डेस्क

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. पोलिसांनी पुन्हा एकदा अँटिलियाच्या सुरक्षेत वाढ केली आहे. एका टॅक्सी ड्रायव्हरच्या सूचनेवरुन ही वाढ करण्यात आली आहे. एका टॅक्सी ड्रायव्हरने मुंबई पोलिसांना कॉल करुन सांगितले की, दोन लोक मला अँटिलियाचा पत्ता विचारत होते. त्या दोन व्यक्तींच्या हातात बॅग होत्या असही त्या टॅक्सी ड्रायव्हरने पोलिसांना सांगितले होते.

पोलिसांनी नवी मुंबईतून एका संशयिताला ताब्यात घेतले आहे. त्याची चौकशी सुरू आहे. हाच व्यक्ती अँटिलियाची चौकशी करत असल्याचे प्राथमिक तपासात समोर आली आहे. ‘हा व्यक्ती गुजरातचा रहिवासी आहे आणि व्यवसायाने ड्रायव्हर आहे. त्याच्याकडून काहीही संशयास्पद आढळले नाही.’ अस मुंबई पोलिसांनी सांगितले आहे.

संशयित दोघे सिल्व्हर कलरच्या वॅगनर कारमधून आल्याचे टॅक्सी ड्रायव्हरने सांगितले. त्यांनी किल्ला कोर्टच्या समोर मला पत्ता विचारला अस टॅक्सी ड्रायव्हरने सांगितलं. पोलिसांनी किल्ला कोर्टपासून अँटिलियापर्यंतचे सीसीटीव्ही फुटेज मागवले आहेत. संपूर्ण परिसराची नाकेबंदी करण्यात आली.

गुगल अॅपवरुन पत्ता शोधण्यास सांगितले

डीसीपी दर्जाचे अधिकारी याचा तपास करत आहेत. “टॅक्सी ड्रायव्हरच्या म्हणण्यानुसार, त्याने दोघांना गुगल अॅपवरून अँटिलियाचा पत्ता शोधण्यास सांगितले,” असे अधिकाऱ्याने सांगितले. त्यांच्याकडे अॅप नसल्याचे सांगून ते तिथून निघून गेले.

अँटिलिया बाहेर मिळाले होते स्फोटक

या अगोदर अँटिलियाच्या बाहेर एक जिलेटीन भरलेली एक स्कॉर्पियो मिळाली होती. या घटनेनंतर हे प्रकरण तापले होते. त्याचा तपास राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) ने जूनमध्ये सुरू केला होता. तपासानंतर बडतर्फ एपीआय सचिन वाझे यांच्यासह अनेकांना अटक करण्यात आली. ही कार ठाणे येथील व्यापारी मनसुख हिरेन यांची होती, त्यांचा मृतदेह मुंब्रा खाडीत सापडला होता.

हेही वाचलत का?

Back to top button