Minister Aslam Shaikh : होय, मलाही क्रूझ पार्टीचे आमंत्रण होते! मंत्री अस्लम शेख यांचा खळबळजनक खुलासा

Minister Aslam Shaikh : होय, मलाही क्रूझ पार्टीचे आमंत्रण होते! मंत्री अस्लम शेख यांचा खळबळजनक खुलासा
Published on
Updated on

'मुंबईतील ड्रग्ज पार्टीत मलादेखील काशिफ खानकडून निमंत्रण आले होते; मात्र मी त्या पार्टीत गेलो नाही. कू्रझवरील पार्टीची मला कोणत्याही प्रकारे माहिती नव्हती. त्या पार्टीच्या माध्यमातून काही तरी षड्यंत्र रचण्याचा डाव होता काय, हे मला माहिती नाही. त्याचा खुलासा तपास एजन्सीने करावा,' असे मंत्री अस्लम शेख (Minister Aslam Shaikh) यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.

काशिफ खान याला मी काही ओळखत नाही. याआधीही मी त्याला भेटलेलो नाही. त्याने मला या पार्टीला आमंत्रित केले होते. मुंबई शहराचा पालकमंत्री म्हणून मला अनेक आमंत्रणे येत असतात. त्याच पद्धतीने सर्व निमंत्रणांमध्ये हेदेखील एक निमंत्रण होते, असा खुलासा मंत्री शेख यांनी केला.

minister aslam shaikh : याप्रकरणी फार काही माहीत नाही

जिथे मला जायचंच नाही त्याबाबत त्या व्यक्‍तीचा नंबर घेणे किंवा त्याची माहिती घेणे हे मला काही उचित वाटत नाही; पण आता यामागे नेमके काय षड्यंत्र होते हे दोन-दोन एजन्सी आता तपासतील, असे म्हणत अस्लम शेख यांनी आपल्याला याप्रकरणी फार काही माहीत नसल्याचे सांगितले.

कासिफकडे माझा मोबाईल नंबर आहे की नाही हे मला माहीत नाही. कारण, माझा मोबाईल हा जास्तीत जास्त वेळ हा माझ्या पीएकडेच असतो. कासिफने मला बोलावले होते. एका ठिकाणी भेटल्यावर, त्याने आमंत्रण केले होते. त्या ठिकाणी तो कसा आला ते मला माहीत नाही, असे ते म्हणाले.

काय म्हणाले अस्लम शेख?

होय, मला क्रूझ पार्टीचं आमंत्रण होतं ड्रग्ज प्रकरणातील सर्व पुरावे नवाब मलिक यांनी मीडियासमोर ठेवलेत काशिफने मला फोन केला होता; पण मी त्याला ओळखत नाही आमंत्रणापाठीमागचा कट काय, त्याचा तपास यंत्रणांनी शोध घ्यावा या माध्यमातून महाराष्ट्र सरकारला बदनाम करण्याचे काम सुरू आहे. क्रूझ पार्टीला परवानगी देण्याचे काम राज्य सरकारचे नाही

वानखेडे कुटुंबीय आज घेणार राज्यपालांची भेट

एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांचे कुटुंबीय उद्या मंगळवारी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेणार आहेत. मंत्री नवाब मलिक यांनी केलेल्या आरोपांच्या पार्श्‍वभूमीवर वानखेडे यांच्या पत्नी क्रांती रेडकर, ज्ञानदेव वानखेडे आणि यास्मिन वानखेडे मंगळवारी सायंकाळी राजभवनावर जाणार आहेत.

दरम्यान, मंत्री मलिक यांनी ट्विटरद्वारे हर्षदा दीनानाथ रेडकर यांच्याबद्दल केलेल्या आरोपांवर बोलताना क्रांती रेडकर म्हणाल्या, माझ्या बहिणीला सातत्याने लक्ष्य केले जात आहे. आमच्या कायदेशीर टीमच्या सल्ल्यानुसार, हे प्रकरण न्यायालयात प्रलंबित असल्यामुळे यावर मत प्रदर्शन करणे योग्य नाही. माझी बहीण कायदेशीररीत्या नवाब मलिक यांच्या ट्विटला उत्तर देईल. या केसशी समीर वानखेडेंचा संबंध नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news