हेरिटेज कोल्हापूर विषयावर निबंध स्पर्धा दैनिक ‘पुढारी’ संचलित प्रयोग सोशल फाऊंडेशनचा उपक्रम | पुढारी

हेरिटेज कोल्हापूर विषयावर निबंध स्पर्धा दैनिक ‘पुढारी’ संचलित प्रयोग सोशल फाऊंडेशनचा उपक्रम

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा

‘जागतिक हेरिटेज सप्ताह’ 19 ते 25 नोव्हेंबर दरम्यान साजरा करण्यात येतो. यानिमित्ताने दै. ‘पुढारी’ प्रयोग सोशल फाऊंडेशन, यशवंतराव चव्हाण (केएमसी) कॉलेज, गोमटेश इंग्लिश मीडियम स्कूल, निपाणी यांच्या संयुक्‍त विद्यमाने जिल्हास्तरीय निबंध स्पर्धा घेण्यात येत आहे. ‘हेरिटेज कोल्हापूर’चा ऐतिहासिक, सांस्कृतिक, कला-क्रीडा परंपरेचा वारसा जतन-संवर्धनाची जाणीव युवावर्गात निर्माण व्हावी, या हेतूने स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. (हेरिटेज कोल्हापूर)

स्पर्धेत विनामूल्य सहभाग घेता येणार आहे. सहभागी स्पर्धकांनी दिलेल्या विषयांपैकी एका विषयाची निवड करून निबंध कमाल 1500 शब्द मर्यादेत स्वतः लिहावा. आपले पूर्ण नाव, पत्ता, महाविद्यालय व संपर्क क्रमांक निबंधासोबत लिहून 20 नोव्हेंबरअखेर pudhariyouthconnect@gmail.com मेलवर युनिकोड स्वरूपात पाठवावा.

हेरिटेज कोल्हापूर : ही स्पर्धा दोन फेरीत होणार

ही स्पर्धा दोन फेरीत होणार आहे. पहिल्या फेरीत प्रत्येक तालुक्यातून एक उत्कृष्ट निबंध निवडला जाणार असून, अंतिम फेरीत 12 स्पर्धक पात्र ठरतील. त्यातून प्रत्यक्ष मुलाखतीद्वारे स्पर्धेतील विजेत्यांची निवड करण्यात येणार आहे.

प्रथम, द्वितीय, तृतीय व दोन उत्तेजनार्थ स्पर्धकांना मान्यवरांच्या उपस्थितीत गौरवण्यात येणार आहे. प्रत्येक सहभागी स्पर्धकाला प्रशस्तिपत्र देण्यात येईल. परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील. या स्पर्धेत कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

स्पर्धेत सहभागासाठीचे विषय

करवीर संस्थापिका रणरागिणी छत्रपती ताराराणी

राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा सामाजिक द‍ृष्टिकोन

राजर्षी शाहू महाराजांचे वैचारिक वारस राजाराम महाराज

ऐतिहासिक वास्तूंचे संवर्धन व विद्यार्थ्यांची भूमिका

कलापूर व क्रीडानगरी कोल्हापूर

निसर्गसंपन्‍न कोल्हापूर व जैवविविधता

Back to top button